उल्हासनगरात सलुनवाले घेतात केस दाढीचे मनमानी पैसे
- by Rameshwar Gawai
- Jan 24, 2021
- 593 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात लॉक डाउन सुरु असताना सर्वच सलुन चे दुकाने बंद होती मात्र अनलॉक मध्ये नंतर सलून खोलण्यास परवानगी देण्यात आली.परंतु दुकाने खोलल्या नंतर या सलुन मालकानी दाढी व केस कापण्याचे मनमानी दर लावले आहे.सलून मध्ये केस कटिंग असो किंवा दाढी करणे या करता जास्त दर आकारले जात असल्याचे समोर आल्याने या बाबत ची तक्रार समाज सेवक ॲड प्रशांत चंदनशिव यानी नाभिक संघटनेचे अध्यक्ष याना लेखी तक्रार देवुन या सर्व सलुन दुकानाच्या बाहेर दर पत्रक लावण्याची मागणी केली आहे .
उल्हासनगर शहरात लॉक डाऊन सुरु झाल्यावर शहरातील सर्वच सलुन चे दुकाने बंद होती .त्यामुळे या सलुन वाल्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.मात्र शासनाने अनलॉक सुरु केल्यावर या सलुन च्या दुकान मालकानी आपली दुकाने सुरु केली परंतु दुकाने सुरु करुन या दुकानदारानी मनमानी पणे पैसे उकळणे सुरु केले . तर ही बाब स्माजसेवक ॲड प्रशांत चंदनशिव यांच्या लक्षात आली .तेव्हा त्यानी कुठल्या ही प्रकार ची दर वाढ नसताना ही दरपत्रक दुकानात न लावता जास्त दर आकारण्यात येत असल्यामुळे नाभिक संघटना उल्हासनगर शहर यांच्याशी चर्चा केली आणि नवीन दरपत्रक लावण्यात यावे जेणे करून ग्राहकांना किती पैसे द्यायचे ही माहिती मिळेल.या संदर्भात नाभिक संघटनेचे अध्यक्ष याना निवेदन देण्यात आले .तर
८ ते १० दिवसाच्या आत नवीन दरपत्रक उपलब्ध करून देण्यात येईल आणि जो कोणी सलुन दुकानदार दरपत्रका पेक्षा जास्त दर घेत असल्याचे आढळुन आल्यास आमच्याशी संपर्क करावे असे नाभिक संघटने च्या वतीने सांगण्यात आले आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम