ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याचा रक्कम जमा,दशरथ तिवरे यांनी केला होता पाठपुरावा

शहापुर  (महेश धानके)      ठाणे जिल्ह्यात    झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व पीकविमा मिळावा म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील 31459  शेतकऱ्यांच्या खात्यात  पीकविमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दशरथ तिवरे यांनी याबाबत सतत पाठपुरावा केला होता, 

शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मिळावेत अशी त्यांनी मागणी केली होती,त्यानुसार आता हेक्टरी 22750 रुपये मंजूर झाले असून शहापुर तालुक्यातील 11482 शेतकऱ्यांना 10 कोटी 76 लाख रुपये मुरबाड तालुक्यातील  9866 शेतकऱ्यांना 8 कोटी 38 लाख रुपये,भिवंडी तालुक्यातील 6924 शेतकऱ्यांना 5 कोटी 80 लाख रुपये,कल्याण तालुक्यातील 3074 शेतकऱ्यांना 1कोटी 49 लाख रुपये,अंबरनाथ तालुक्यातील 914 शेतकऱ्यांना 86 लाख रुपये, ठाणे तालुक्यातील 187 शेतकऱ्यांना 13 लाख रुपये विमा रक्कम मंजूर झाली आहे म्हणजेच ठाणे जिल्ह्यात 31 हजार 459 शेतकऱ्यांना 27 कोटी 45 लाख रुपये विमा रक्कम मंजूर झाली आहे,या कामी लोकप्रतिनिधी यांचेसह शासकीय अधिकारी यांनीही चांगले व शेतकरी हिताचे काम केल्याचे दशरथ तिवरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरीव विमा रक्कम मंजूर करणाऱ्या  महाविकास आघाडीचे तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री यांचे दशरथ तिवरे यांनी आभार व्यक्त केले आहेत

संबंधित पोस्ट