उल्हासनगर कॉंग्रेसच्या वतीने अर्णब गोस्वामी विरुध्द जनआंदोलन .

उल्हासनगर(प्रतिनिधी)देशाच्या लष्करातील गोपनिय माहीती अर्णब गोस्वामी याला कशी मिळाली हे व्हॉटसप वर उघड होताच चर्चेला उधाण आले आहे देशभरात अर्णब चा निषेध होत आहे .तर  केंद्र सरकारचा सुध्दा सर्वत्र निषेध सुरु आहे . तेव्हा उल्हासनगर कॉंग्रेस शहर कॉंग्रेस च्या वतीने उल्हासनगर येथिल नेहरु  चौकात अर्णब गोस्वामी विरुध्द शहर अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन करुन अर्णब चा जाहीर निषेध केला आहे .  

पुलवाम हल्ल्याची माहीती सर्वात अगोदर अर्णब गोस्वामी याला मिळाली हे समाज माध्यमावर उघड होताच देशभरात अर्णब सह केंद्र सरकारचा निषेध सुरु आहे . तेव्हा उल्हासनगर येथिल शहर कॉंग्रेस च्या वतीने केंद्र सरकार आणि अर्णब गोस्वामी यांचा निषेध नोंदवन्या साठी कॅप २  येथिल नेहरु चौकात शहर अध्यक्ष रोहित साळवे यांच्या  नेतृत्वा खाली जन आंदोलन करन्यात आले . या आंदोलनात उल्हासनगर ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके . दिपक  सोनवणे . सचिन गांधी .नारायण गेमनानी . महादेव शेलार . महेश मिरानी . आशाराम टाक यांच्या सह शेकडो कॉंग्रेस चे पदाधिकारी सहभागी झाले होते .

संबंधित पोस्ट