आदिम जमातीच्या बचत गटांना विटभटटी उभारणेसाठी अर्थसहाय्य

पालघर(प्रतिनिधी) :  आदिम जमातीचे संरक्षण व विकास कार्यक्रमा अंतर्गत प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ,जव्हार  अंतर्गत जव्हार,मोखाडा,विक्रमगड व वाडा या चार तालुक्यातील आदिम जमातीच्या (कातकरी) विटभटटी  उत्पादक गटांमार्फत  आदिम जमातीचे संरक्षण व विकास करणे या उद्येशाने  स्थलांतर रोखने , रोजगारनिर्मिती व विपणन व्यवस्थेचे बळकटीकरण व्हावे या उद्देशाने आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत Financial support for the productin of bricks to tribal SHGS  (आदिम जमातीच्या बचत  गटांना विटभटटी उभारणेसाठी अर्थसहाय्य देणे )  हि योजना मंजुर करण्यात आलेली आहे.

लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रांसह या कार्यालयात दि.21.01.2021 ते दि.29.01.2021 या कालावधीत विहीत नमुन्यात अर्ज सादर करावे.

अटी व शर्ती तसेच कागदपत्रांबाबत तपशिल खालीलप्रमाणे

लाभार्थी गट हा नोंदणीकृत असावा,नोंदणीचे प्रमाणपत्र सादर करावे, लाभार्थी गट हा आदिम जमातीचाच असावा, गटातील लाभार्थ्यांचे जातीचे दाखले जोडण्यात यावे, लाभार्थी भाजिपाला उत्पादक गटाचा ठराव जोडण्यात यावा, लाभार्थ्यांकडे विटभट्टीसाठी जमिन उपलब्ध असल्याची कागदपत्रे सोबत जोडावी, लाभार्थ्यांचा रहीवाशी दाखला असावा, ग्रामसभेचा ठराव व नाहरकत दाखला, लाभार्थ्याचे आधारकार्ड व रेशनकार्ड च्या छायांकीत प्रती अर्जासोबत सादर कराव्या, बचत गटाच्या बँक पासबुकची झेरॉक्स जोडण्यात यावी, बचत गटातील प्रत्येक लाभार्थ्यांचा अर्ज, बचत गटातील सर्व सदस्यांचे एकत्रित व्यवसाय करण्याचे संमतीपत्र.(सर्व सदस्यांचे स्वाक्षरीसह), विधवा,परितक्त्या ,दिव्यांग लाभार्थ्यांच्या भाजिपाला उत्पादक गटांना  योजना मंजुर करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, बचत गटातील लाभार्थ्यांचे फोटोरजिस्टर खालिल नमुन्यात देण्यात यावे. अ.क्र. बचतगटाचे नांव, सदस्याचे नांव, जात, शिक्षण, दारीद्यरेषेचा क्रमांक, आधार क्रमांक, फोटो, स्वाक्षरी

अंतिम लाभार्थी निवडीबाबतचे सर्व अधिकार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी,जव्हार यांनी  राखुन ठेवण्यात आले आहेत, विहीत नमुन्याचे लाभार्थी अर्ज कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत, यापुर्वीचे सर्व अर्ज बाद करण्यात आलेले आहेत.

सदरची योजना कातकरी लाभार्थ्यांसाठीच असल्याने कातकरी लाभार्थ्यांनीच विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प कार्यालयातुन नोंदणी करुन घेवुन जावेत व परीपुर्ण भरुन सादर करावे.

संबंधित पोस्ट