राजापूर येथील गंगास्थानी प्रगट झालेल्या गंगामाईचे दर्शन-आशिर्वाद व पुण्यपावन गंगास्नानाचा लाभ घ्यावा!...
प.पू.श्री.उल्हासगिरी महाराज यांचे आवाहन .....
- by Reporter
- Mar 31, 2024
- 350 views
राजापूर: भगवान श्री.परशुरामांच्या पावन भूमीत राजापूर तालुक्यातील उन्हाळे येथील प्रसिद्ध गंगातीर्थ स्थानी प्रगट झालेल्या पुण्यपावन गंगामाई चे दर्शन-आशिर्वाद घेऊन पवित्र गंगास्नानाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन स्वामी गगनगिरी महाराजांचे राजापूर तालुक्यातील अर्वाचीन-प्राचीन जागृत स्थान असलेल्या, "कोंडीवळे-ओणी" येथील आश्रमांतील स्वामी गगनगिरी महाराजांचे कृपा-आशिर्वादाने कार्यरत असणारे स्वामी श्री.उल्हासगिरी महाराज यांनी केले आहे!
स्वामी उल्हासगिरी महाराजांनी नुकतेच गंगातीर्थ स्थानी येवून गंगास्नान करून गंगामाईची पुजा-अर्चा केले व प्राचीन धुतपापेश्वर मंदिरास भेट दिली!
रिपोर्टर