अखेर उल्हासनगर महापालिका देणार आशा सेविकाना थकीत मानधन.

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर मध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता महापाकिकेने ११० आशा सेविकाना जोखिमीचे काम दिले होते . त्या आशा सेविका कोरोना कालावधीमध्ये संभाव्य रुग्णांचा शोध घेणे, दक्षतेकरीता जनजागृती, सर्वेक्षण करण्याचे काम देवुन त्यांच्या कडुन  अल्पशा मानधनावर  काम करुन घेत होते . या आशा सेविकाना पालकमंत्र्यांच्या आदेशाने प्रतिदिन ३०० रुपये असे मानधन देन्याचे निश्चित झाले असताना ते मानधन अद्याप पर्यंत त्याना मिळाले नाही . अखेर ४२ दिवसाचे मानधन देन्यास महापालिका तयार झाले आहे . तर  अर्धे मानधन या महिन्यात देणार असुन उर्वरित मानधन पुढील महिन्यात देण्याचे निश्चित केल्याने आता थकीत मानधन आशा सेविकाना मिळणार आहे . 

उल्हासनगर महापालिकेने  ११० आशा सेविकाना  कोविड युध्दात जीव जोखमीत टाकून  १००० रुपये दरमहा तुटपुंज्या मानधनावर आपले योगदान दिले. परंतु, या साहसी कामगिरी बद्दल या आशा सेविकाना  वाढिव मानधन मिळण्यासाठी नगरसेविका सविता तोरणे रगडे व अशोका फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी रगडे यांनी महापालिका प्रशासना कडे सातत्याने पाठपुरावा केला. 

दरम्यान  याची दखल घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे मानधन प्रतिदिन ३०० रुपये करण्याचे तात्काळ आदेश  आयुक्तांना दिले होते. मात्र महापालिकेने या आशा सेविकांचे मानधन दिले नव्हते अखेर तीन महिन्यांच्या दिरंगाई नंतर महापालिकेने आशा सेविकांचे  ४२ दिवसांचे मानधन वित्तीय प्रशासकीय मान्यता देऊन दोन टप्प्यात अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच पहिला हफ्ता हा आशा सेविकांच्या  पदरात पडणार असल्याने त्यांनी शिवाजी रगडे, नगरसेविका सविता तोरणे रगडे व आयुक्त डॉ राजा दयानिधी यांचे आभार व्यक्त केले आहे.

संबंधित पोस्ट