ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर शिर्के यांचे दुखद निधन .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगरातील  ज्येष्ठ  पत्रकार मुरलीधर शिर्के यांचे काल रात्री उशिरा ह्रदय  विकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले आहे.ते ७५ वर्षाचे होते त्यांच्या मागे दोन मुली एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे . 

उल्हासनगर कॅंप ४ येथे राहणारे ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर शिर्के (७५ ) यानी नोकरी सुटल्यावर पत्रकारितेला सुरवात केली . ते काही सामाजिक संघटना सोबत सुध्दा कार्यरत होते . तर त्यानी कोकण प्रवाशी संघटना स्थापन करुन कोकणातील एस टी प्रवाशाना त्यानी न्याय मिळवुन दिला . तर त्यानी अनेक समाजोपयोगी कामे केलीत . काल ते अन्याय विरोधी संघर्ष समितीच्या वतीने महापालिकेवर वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे विरुध्द सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देत उपोषण स्थळी बसले होते . संध्याकाळी ६ वाजता ते घरी गेले आणि रात्रीच्या सुमारास त्याना ह्रदय विकाराचा झटका आला . आणि त्यातच त्यांचे निधन झाले . आज दुपारी त्यांची अंत्ययात्रा निघुन व्हिनस स्मशान भुमित त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले .

संबंधित पोस्ट