उल्हासनगर महापालिकेचे वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे विरुध्द सुरु असलेल्या उपोषणाचा १२ वा दिवस .

उल्हासनगर(प्रतिनिधी)  : उल्हासनगर महापालिकेचे वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे याला  बडतर्फ करन्यात यावे या मागणी करिता अन्याय विरोधी संघर्ष समिती . पत्रकार सुरक्षा समिती . भीम आर्मी व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व बी आर एस पी  यांच्या वतीने महापालिके समोर बेमुदत उपोषण सुरु केले असुन आज उपोषणाचा १२ वा दिवस आहे. भदाणे विरुध्द शेकडो लेखी पुरावे आयुक्त डॉ.राजा दया निधी याना दिले आहेत तरी पण  ते उपोषणाची दखल घेत नाहीत तर या भ्रष्ट भदाणे ला पाठीशी घालुन उपोषण कर्त्याना सुनावणी साठी तारिख पे तारिख देत आहे . 

उल्हासनगर महापालिकेत युवराज भदाणे हे जनसंपर्क अधिकारी म्हणुन २००३ मध्ये नियुक्त झाले असुन त्याची  निवड ही बेकायदेशीर असल्याचा शेरा निवड समितीने मारलेला असुन तो या पदा करिता लायक नसल्याचा   ही शेरा निवड समितीने मारला आहे . तर तो पत्रकारांवर नेहमी दबाव आणुन माझ्या मर्जी प्रमाणेच लिहायच.  नाही तर पत्रकाराना नोटीसी पाठवुन परेशान करतो . दरम्यान भदाणे हा पब्लिक रिलेशन ऑफिसर आहे तो पत्रकार रिलेशन ऑफिसर नाही . त्याने नागरिकांची कामे करायची आहेत . परंतु तो नागरिकांची कामे न करता तो फक्त पत्रकारांवर लक्ष ठेवुन असतो . दरम्यान त्याने  मंत्रालयातील नगरविकास खात्याचे  बोगस आय डी बनवुन आयुक्तांची दिशाभुल केली आहे . त्याच्यावर एक ॲक्ट्रासिटीचा गुन्हा दाखल असुन दोन विनयभंगाचे देखिल गुन्हे दाखल आहेत .  दरम्यान युवराज भदाणे यानी कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी मधुन कोणता ही प्रबंध न लिहता बोगस पी एच डी घेतली आहे . त्या युनिव्हर्सिटी च्या काही अधिकाऱ्यावर पुणे येथे बोगस पी एच डी प्रकरणी गुन्हे सुध्दा दाखल झाले आहेत . तर बोगस पी एच डी असताना ही भदाणे नावापुढे डॉक्टर लावत आहे . दरम्यान बोगस आय डी प्रकरणी त्याच्या वर कारवाई  करण्यात  यावी म्हणुन अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष व ज्येष्ट पत्रकार दिलीप मालवणकर व पत्रकार मित्र यानी २०१८ मध्ये आमरण उपोषण केले होते .तेव्हा त्याला तत्कालिन आयुक्त गणेश पाटील यानी निलंबित केले होते . मग पुन्हा त्याला सहा महिन्यानी कामावर घेन्यात आले . मात्र त्याचा उर्मट पणा गेलाच नाही . दरम्यान युवराज भदाणे याचे जन्म दाखले सुध्दा दोन आहेत . अशा अनेक मुद्द्याना घेवुन अन्याय विरोधी संघर्ष समिती . प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ . पत्रकार सुरक्षा समिती.  भीम आर्मी आणि बी आर एस पी यांच्या वतीने उल्हासनगर महापालिके समोर दि . ७ जानेवारी पासुन दिलीप मालवणकर व सर्व तत्वनिष्ट पत्रकार यानी  बेमुदत उपोषण सुरु केले आहे  भदाणे यास बडतर्फ करन्यात यावे या मागणी करिता हे उपोषण असुन आयुक्ताना भदाणे विरुध्द शेकडो लेखी पुरावे दिले आहेत . तरी पण आयुक्त भदाणे याला पाठीशी घालुन उपोषण कर्त्यांची थट्टा करत असल्याचे दिसुन येते . या उपोषणाचा आज १२ वा दिवस आहे . तर आज काही निर्णय झाला नाही तर मालवणकर हे मंत्रालयासमोर आत्मदहन करणार होते.परंतु मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर  पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मध्यस्थीने दिलीप  मालवणकर यानी आमरण उपोषण आणि आत्मदहन करन्याचा निर्णय स्थगित केला आहे. तर साखळी उपोषण हे सुरुच राहणार आहे.  दरम्यान आयुक्त डॉ.दयानिधी यानी उपोषण कर्त्याना न भेटता त्याना आता पर्यंत दोन वेळा आपल्या दालनात बोलवुन निष्फळ चर्चा करुन तारिख पे तारिख देवुन उपोषण  कर्त्यांची बोळवण करत आहेत . दरम्यान भदाणे याला वाचवण्यासाठी  ठाणे जिल्ह्यातील दोन मोठे राजकिय नेते प्रयत्न करत असुन ते आयुक्तांवर दबाव आणत असल्याचे समजते.

संबंधित पोस्ट