भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा,नगरसेविका कविता गायकवाड यांची मागणी .

उल्हासनगर(प्रतिनिधी) :  उल्हासनगर महापालिकेच्या पॕनल नं २० गायकवाड पाडा येथिल   डाॕ, बाबासाहेब आंबेडकर  चौक  या परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत  निर्माण झाली असून त्या परिसरातील नागरिक आणि लहान मुलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  तसेच काही नागरिकांना  भटके  कुत्रे चावत असुन दररोज कुत्र्यांचे इंजेक्सन घेन्या करिता नागरिक मध्यवर्ती रुग्णालयात जात आहेत . तेव्हा भटक्या कुत्र्यांचा महापालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका कविता सुरेश गायकवाड यानी महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी याना लेखी निवेदनाद्वारे केली आहे . 

उल्हासनगर कॅंप ५ येथिल प्रभाग क्र . २० मधिल गायकवाड पाडा येथे   भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे हे कुत्रे रस्त्याने चालणाऱ्या नागरिकाना व लहान मुलाना चावे घेत आहेत . त्यामुळे येथिल नागरिकात भितीचे वातावरण पसरले आहे . रोज हे कुत्रे चावा घेत असल्याने नागरिकाना कुत्र्यांचे निर्जंतुक इंजेक्सन घेन्या करिता  स्थानिक आरोग्य केंद्र आणि मध्यवर्ती रुग्णालय या ठिकाणी जावे लागते . तेव्हा या कुत्र्यांचा महापालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका कविता गायकवाड यानी महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी याना एका निवेदनाद्वारे केली आहे .

संबंधित पोस्ट