१० जानेवारी रोजी वालधुनी नदीत केमिकल सोडल्या प्रकरणी अंबरनाथच्या बायेक्झरा या कंपनीवर गुन्हा दाखल .

उल्हासनगर(प्रतिनिधी)१० जानेवारी २०२१ रोजी रात्रीच्या वेळी  अंबरनाथ  उल्हासनगर येथिल वालधुनी नदीच्या काठावर राहणाऱ्या  नागरिकाना घातक केमिकल मुळे डोळ्यात जळजळ उलटी सारखे प्रकार होत होते .तर वालधुनी नदीत केमिकल टाकल्या मुळे हा प्रकार घडला असुन याचा तपास सुरु असताना महाराष्ट्र प्रदुषण बोर्डाचे अधिकारी संजय भोसले यानी या केमिकल टाकल्या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात माहीती दिल्यावर पोलिस यंत्रणा कामाला लागली. तेव्हा पोलिस तपासात अंबरनाथ एम आय डी सी येथिल प्लॉट न .५७  एन  बायेक्झरा फार्मा केमिकल कंपनीचे संचालक सतिश गुंजीकर यांच्या वर   शिवाजीनगर पुलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करन्यात आला आहे .

अंबरनाथ उल्हासनगर शहरातुन वाहणाऱ्या वालधुनी नदीत घातक केमिकल टाकल्याने नदी काठावर राहणाऱ्या नागरिकाना त्या केमिकल चा मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता . तेव्हा सदर केमिकल कोण टाकते याचा शोध प्रदुषण मंडळाचे अधिकारी घेत होते . तेव्हा शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसानी योग्य दिशेने तपास करुन केमिकल टाकणाऱ्या  केमिकल कंपनीचा अखेर शोध लावन्यात यश आले आहे . पोलिसानी  सरंक्षण कायदा १९८६ /१५  अंतर्गत  कलम  २६८ ,२६९ ,२७० ,२७८ ,२४८ प्रमाणे  बायेक्झरा फॉर्मा केमिकल कंपनीचे संचालक सतिश गुंजीकर यांच्यावर  गुन्हा दाखल झाला आहे.तर ५० केमिकल  कंपन्याना रेड झोन क्लोजर नोटीस देखिल पाठवन्यात आली आहे .

संबंधित पोस्ट