उल्हासनगरात ४५ दिव्यांग नागरिकांना धान्य किटचे वाटप.
त्रिरत्न बौद्ध महासंघ व बहुजन हिताय विद्यार्थी वस्तीगृहाचा स्तुत्य उपक्रम.
- by Rameshwar Gawai
- Jan 17, 2021
- 527 views
उल्हासनगर(प्रतिनिधी):कोरोना लॉकडाऊन काळात उद्योग,व्यवसाय बंद झाले होते. अर्थकरण बिघडल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.तर व्यवसाय बंद झाल्याने अर्थिक उलाढाल थंडावली.सर्वत्र दिव्यांगाच्या जगण्यालाही मोठा फटका बसला आहे.अशा गरीब,अनाथ,अपंग,अंध नागरिकांना एक हात मदतीचा करत त्रिरत्न बौद्ध संघ व बहुजन हिताय विद्यार्थी वस्तीगृह उल्हासनगर ४ केंद्रा तर्फे धान्य वाटप करत असून गेल्या १० महिन्यापासून विविध उपक्रम राबवित सामाजिक बांधिलकी जपत आहे.कोरोनाच्या काळात कोरोनापासून नागरिकांचं संरक्षण व्हाव यासाठी उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर ,कल्याण डोंबिवली,मुंबई पर्यंत सॅनिटायझर कीटच वाटप करण्यात आले होते . डिसेंबर ते जानेवारीत विट भट्टीवर काम करणाऱ्या गरीब, गरजू,नागरिकांना धान्य व ब्लँकेट वाटप करण्यात आले .तर गरोदर,बाळंतीण महिलांना स्पेशल किट देऊन मदत केली आहे.मुंबईची लाईफलाइन समजली जाणारी लोकल प्रवासाला दिव्यांगाना मुभा नसल्याने लोकल मध्ये भिक्षा मागून किंवा काही साहित्य विक्री बंदी असल्यामुळे उपासमारीची वेळ आली होती अशा ४५ गरजू दिव्यांग नागरिकांना एक हात मदतीचा करत धान्यांची किट वाटप करण्यात आले.सदर किट वाटपा करिता संस्थेचे धम्मचारी धैर्यसिद्धी,निता मैत्रक,लीला भाले,निलेश भगत,धमचारी अक्षयबोधी यांनी मदत केली आहे.

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम