सेंच्युरी रेयॉनच्या सुरक्षा रक्षकानी पकडला घातक रसायन टाकणारा टॅंकर .
- by Rameshwar Gawai
- Jan 14, 2021
- 499 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर कॅंप १ येथिल शहाड जवळ असलेल्या सेंच्युरी रेयॉन च्या मागील आय डीआय कंपनीच्या रोड वरील मटेरियल गेट जवळ उल्हासनगर महापालिकेने बनवलेल्या नाल्यामध्ये ९ जानेवारी रोजी घातक रसायन एका टॅंकर द्वारे सोडन्यात आले होते.तो टॅंकर कंपनीच्या सुरक्षा रक्षकानी पकडला असुन ड्रायव्हर मात्र फरार झाला आहे .
उल्हासनगर शहाड येथे असलेल्या सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या बाजुने जाणाऱ्या नाल्यातुन केमिकल चा उग्र वास येत होता . तेव्हा चौकशी केल्यावर एक टॅंकर ( एम एच ०४ इ एल ०८७८ ) कंपनीच्या निवासी संकुला बाहेर उभा असलेला दिसुन आला आणि त्या टॅंकर मधुन हा वास येत होता . याच टॅंकर द्वारे मटेरियल गेट जवळ असलेल्या नाल्यात घातक केमिकल टाकल्याचे वासावरुन निष्पन्न झाले आहे . दरम्यान या टॅंकर ची माहीती उल्हासनगर पोलिसाना देन्यात आली तर हे घातक रसायन कोणते आहे . याची चौकशी महाराष्ट्र प्रदुषण मंडळ व सेंच्युरी रेयॉन कंपनी करत आहे . तर टॅंकर मालक आणि ड्रायव्हर यांचा शोध पोलिस घेत आहेत.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम