माजी भाजप मंत्री जनार्दन रेड्डींना अटक, ६०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
- by Adarsh Maharashtra
- Nov 11, 2018
- 847 views
बंगळुरू - बेल्लारीचे खाण माफिया आणि माजी भाजप मंत्री जनार्दन रेड्डी यांना पोंजी स्कीमअंतर्गत ६०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांचा साथीदार अली खानलाही अटक करण्यात आली आहे. क्राइम ब्रँचने रेड्डींना ११ नोव्हेंबरपर्यंत हजर होण्याची नोटीस दिली होती. यानंतर रेड्डी शनिवारी संध्याकाळी चौकशीसाठी क्राइम ब्रँचपुढे हजर झाले होते. जनार्दन रेड्डींवर एका पोंजी स्कीममध्ये कथितरीत्या कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.माजी भाजप मंत्र्यांविरुद्ध नोटीस जारी करण्याच्या एका दिवसापूर्वी क्राइम ब्रँचने त्यांच्या बेल्लारी स्थित निवासस्थानी छापा टाकला होता. रेड्डींचे सहयोगी अली खान यांनी एंबिडेंट मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडच्यास सैयद अहमद फरीद यांच्याशी ईडीच्या चौकशीतून वाचवण्यासाठी कथितरीत्या २० कोटी रुपयांचा सौदा केला होता. या कंपनीवरही फसवणुकीच्या योजनेत सहभागी असल्याचा आरोप आहे.शनिवारी क्राइम ब्रँचसमोर हजर होण्याआधी रेड्डींनी या चौकशीपासून वाचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. शुक्रवारी रेड्डींचे वकील सीएच हनुमंथरैया यांनी अग्रिम जामिनाची याचिका दाखल केली. तथापि, कोर्टाने वादींना सोमवारपर्यंत आक्षेप दाखल करण्याचा आदेश दिला, यानंतर याचिका परत घेण्यात आली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम