घणसोली गावात तीन मजली इमारतीला अभय नवीन सुरु असलेल्य इमारतीच्या "पाया" फुटींगचे काम तोडले !

अतिक्रमण अधिका-यांना केले पैश्याने अंधाळे ?

नवीमुंबई:(सुनिल गायकवाड) नवीमुंबई महानगरपालिका क्षेत्रात घनसोली गावात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामासाठी भूमाफियांनी पुढाकार घेतला असुन मिळेल तिथे चाळकरी नागरिकांना हाताशी धरुन टोलेजंग इमारती बणविण्याची रणनीती आखली जात आहे. त्याता महानगर पालिकेच्या घणसोली विभागातील व सिडकोच्या अतिक्रमण विभागाची फार मोठ्या प्रमाणात जबाबदारी वाढल्याचे चित्र घनसोली मध्ये दिसत आहे.

हे चित्र इतकं भयानक आहे कि या चित्राचे उत्तर त्यांनी केलेल्या किरकोळ तोडू कारवाईत स्पष्ट दिसत आहे. हे चित्र म्हणजे चोर सोडून इतरांना फाशी असल्याचीे चर्चा घनसोली विभागात होत आहे.

या बाबत माहीती आशी कि घनसोली विभागात अर्जुन वाडी या ठिकाणी एका बांधकाम व्यावसायिकाने चाळी तोडून नविन इमारत बांधण्याचे काम सुरु केले आहे त्या इमारतीला अवश्यकता असलेला पाया फुटिंग चे काम सुरु होते यांची माहीती कर्तव्याची जाण असलेल्या सिडको आणि घनसोली पालिका अतिक्रमण विभागाला त्यांच्या गुप्त खब-या पासुन  मिळाली अतिक्रमण विभागाच्या अधिकारी वर्गाने सतर्क राखत पोलिस फौजपाट्या सहीत इमारतीते सुरु असलेल्या बांधकामाचा पाय फुटिंग तोडून प्रचंड मोठी कारवाई केल्याची रंगीत तालीम दाखवत चित्र निर्माण केले हे चित्र म्हणजे पालिकेची व सिडकोची  लाज वेसीवर टांगली जाईल इतक मोठ चित्र दिसुन आले.

याला कारण म्हणजेच याच कारवाईच्या ठिकाणी एका इमारतीची काम मोठ्या प्रमाणात जोमाने सुरु आहे हे काम तीन मजल्यापर्यंत आले आहे या सुरु असलेल्या इमारतीच्या एका विटेला धक्का न लावता पालिकेचे व सिडको चे अधिकारी हात हालवत परत गेले. याचा अर्थ असा होईल सुरु असलेल्या इमारतीचे काम हे अधिकृतरित्या आहे आणि किरकोळ कारवाई केलेल्या व सुरु असलेल्या इमारतीचे काम अनाधिकृत आहे. म्हणजेच पालिकेने व सिडकोने ज्या इमारतींना जमीनदोस्त केले नाही त्या इमारती नागरिकांनी अधिकृत समजावयात का ? याचे उत्तर घनसोली पालिका व सिडकोकडून मिळणे जरुरीचे आहे.

दरम्यान: घनसोली विभागात या पुर्वी मोठ्या प्रमाणात व सध्याच्या स्थितीत अनेक अनाधिकृत बांधकामासाठी भूमाफियांनी पुढाकार घेतला आहे. तात्कालिन नवीमुंबई महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे असतांना भूमाफिया व भूमाफियांना अभय देणारे अतिक्रमण विभागाच्या अधिकारी वर्गाला धडकी भरली होती ती धडकी इतकी मोठ्या प्रमाणात होती की काही भ्रष्ट अधिकारी वर्गाचा बेल्डफेशर वाढून कधी हृदयविकाराचा झटका येईल याची शाश्वती नव्हती तुकाराम मूंढे यांची बदली झाली आणि अनाधिकृत बांधकामासाठी पुन्हा भूमाफिया आणि भूमाफियाचे सरदार सरसावले आणि पाहीजेल तिथे बांधकाम करण्याचा सपाटा सुरु केला आहे "

सब भूमी राम गोपाल" की या प्रमाणे सुत्र सुरु केले आहे.

हे सुत्र जरी बरोबर असलं तरी या सूत्रांच्या नुसार हे अतिक्रमण अधिकारी नसुन भूमाफियाचे ठेकेदार झाले आहेत का ? हे सुत्र तयार होईल शेवटी एवढंच आहे. पैश्यांच्या किंमती पुढे हे अधिकारी अंधाळे झाले हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषीची गरज नाही हे मात्र नक्की !.

संबंधित पोस्ट