
साहित्यिका मेधा जाधव यांची मराठी साहित्य मंडळाच्या गोवा प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती
- by Reporter
- Jan 12, 2021
- 904 views
गोवा (प्रतिनिधी)स्वतःच्या जगण्या सोबत इतरांच्या जगण्याकडे त्याच समकक्ष दृष्टीने पहाणे म्हणजे कवी होणे आणि नेमके हेच कवी पण ज्यांच्या जगण्यात लिहिण्यात ठासून भरलेले आहे अशा गोव्याचा कवयित्री व लेखिका मेधा जाधव यांना आणखी एक मानाचा बहुमान प्राप्त झाला असून, मराठी साहित्य मंडळाच्या अखिल भारतीय साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळावर सौ मेधा पारधीये- जाधव यांची संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष साहित्यिक जयप्रकाश घुमटकर ,राष्ट्रीय उपाध्यक्षा ललिता गवांदे व राष्ट्रीय सरचिटणीस सोनम ठाकूर यांच्या शिफारशीनुसार आणि आदेशाने गोवा प्रदेश अध्यक्ष पदी पुढील पाच वर्षाकरिता नियुक्ती झाली असून,या निवडी बद्दल त्यांचे गोवा राज्यासह महाराष्ट्रातुन अभिनंदन होत आहे.
कवयित्री मेधा जाधव यांना आजवर अनेक सन्माननिय पुरस्कार प्राप्त झाले असून कणकवली सारख्या निसर्ग संपन्न नयनरम्य तालुक्यात ज्यांचे बालपण गेले त्या माहेराचा वसा आणि आपल्या लेखणीने साहित्य क्षेत्रात नवा ठसा उमटवत जाणाऱ्या मेधा यांच्या साहित्यात कोकणातल्या लाल मातीचा सुगंध नेहमी दरवळतो.आपल्या कवितेने रसिकांच्या वाचकांच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या सौ मेधा आपल्या हाताने खवय्यांना आपल्या उत्तमोत्तम रुचकर पदार्थांनी तृप्त करतात. पेशाने उत्तम सुगरण(शेप) असून त्यासोबत त्या फॅशन डिझानयर आणि ब्युटीशीयन ही आहेत.
मेधा जाधव यांची मराठी साहित्य मंडळाच्या गोवा प्रदेश अध्यक्ष पदी झालेली नियुक्ती कवयित्री मेधा जाधव आपल्या अंगभूत कौशल्यांनी सार्थ ठरवतील अशी प्रतिकिया साहित्य विश्वातुन उमटत आहे.
रिपोर्टर