छत्तीसगड निवडणुकीआधी हादरले; नक्षलवाद्यांकडून ६ बॉम्बस्फोट
- by Adarsh Maharashtra
- Nov 11, 2018
- 1073 views
छत्तीसगड: निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला फक्त एक दिवस उरला असताना कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. या हल्ल्यात एकामागोमाग एक असे ६ बॉम्बस्फोट नक्षलवाद्यांनी केल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे.
छत्तीसगडमधील निवडणुकांना नक्षलवाद्यांचा प्रचंड विरोध होतो आहे. निवडणुकांदरम्यान नक्षलवादी घातपात घडवण्याचीही शक्यता आहे. यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. बीएसएफचं एक पथक आज सकाळी रेकी करण्यासाठी गेलं असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. आयईडी तंत्राचा वापर करून एकामागोमाग एक बॉम्बस्फोट घडवून आणले. या हल्ल्यात अनेक अनेक जवान जखमी झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे. नक्षलवाद्यांनी काही दिवसापूर्वी दुरदर्शनच्या एका कॅमेरामॅनचीही हत्या केली होती. त्यानंतर रोजच नक्षलवादी आणि जवानांमध्ये राज्यभर चकमक होते आहे. बीजापूर परिसरातही काल एक जवान ठार झाल्याची घटना ताजी आहे. गेल्या आठवड्यात सुरक्षा दलांनी तब्बल ३०० आयईडी बॉम्ब जप्त केले आहे, छत्तीसगडची निवडणूक सुरळीतपणे पार पाडणे हे लष्करासमोरचं आव्हान आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम