माळी समाज सेवा समिती यांच्या वतीने उल्हासनगर येथे रक्तदान शिबिर संपन्न.

उल्हासनगर(प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी देखील रक्तदान करण्यासाठी लोकांना आवाहन केले आहे.या आवाहनास प्रतिसाद देत माळी समाज सेवा समिती व वंचित बहुजन आघाडी, उल्हासनगर यांच्या वतीने व डोंबिवली ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने डॉ.राम मुंदडा व डॉ. राजेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली रामरक्षा हॉस्पिटल उल्हासनगर-४ येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.या शिबिरास वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे, सौ.प्रतिभाताई महाजन,सौ.लता पगारे शांताराम माळी,चिंतामण अहिरे तसेच मुंबई माळी समाज मंडळाचे अध्यक्ष दिलीप माळी व सचिव प्रा.प्रकाश माळी यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे मनोधैर्य वाढविले.शिबिर यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्रा.सुरेश सोनवणे व त्यांचे कार्यकर्ते डोंबिवली ब्लड सेंटरचे डॉक्टर्स व स्टाफ तसेच माळी समाज सेवा मंडळाचे पदाधिकारी सदस्य व समाज बंधू-भगिनींनी अतिशय मोलाचे परिश्रम घेतले.या शिबिरात ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.तर या सर्व रक्तदान करणाऱ्या तरुणांचे प्रा . सुरेश सोनवणे यानी आभार मानले आहे .

संबंधित पोस्ट