महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने दिलेल्या नोटीसाना अंबरनाथ उल्हासनगर येथिल ५० केमिकल कंपन्या कडुन केराची टोपली .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने अंबरनाथ उल्हासनगर येथील ५०  केमिकल कंपन्या,सहअंबरनाथ नगरपालिका  कार्यालय, कुळगाव बदलापुर नगरपालिका त्याच प्रमाणे अंबरनाथ येथील सीईटीपी ला नोटिसा पाठवल्या आहेत  परंतु या कंपन्या कडुन नोटीसाना  केरा ची टोपली दाखवन्यात आली  आहे, 

२  वर्षापुर्वी  सर्वोच्च न्यायालयाच्या  आदेशा नुसार उल्हासनगरच्या ५००  जिंस वॉश कंपन्या चे नळ व वीज कनेक्शन महापालिकेने  कापले  होते,तर आता ५०  केमिकल कंपन्या चे नळ आणि  वीज कनेक्शन कधी कापणार? असा प्रश्न जन सामान्या तुन विचारला जात आहे,

काल १०  जानेवारी सकाळ पासुन रात्र झाली तरी ही वालधुनी नदी किनारी राहणारे नागरिक केमिकल च्या उग्र वासाने  त्रस्त होते, तर सकाळ पासूनच अंबरनाथ येथून विषारी केमिकल वालधुनी नदी पात्रात सोडण्यात आले होते, यामुळे नागरिकांचे डोळे जळजळणे व  केमिकलचा उग्र वास येणे असा प्रकार घडला  आहे.

भरत नगर कानसई सेक्शन अंबरनाथ  शिवमंदिर.  उल्हासनगर कॅंप ५  या परिसरात  उग्र वास येत असल्याची तक्रार  स्थानिक नागरिक करत होते . दरम्यान कॉंग्रेस चे शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यानी रात्रीच बाहेर पडुन पोलिस यंत्रणा व महाराष्ट्र प्रदुषण मंडळ याना मोबाईल द्वारे कळवुन या केमिकल टाकणाऱ्या कंपन्यांचा बंदोबस्त करा असे बजावले . दरम्यान काही नागरिकाना श्वास घेन्यास त्रास होत असल्याने ते रात्रीच रस्त्यावर उतरले होते . सध्यस्थितीत  प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व पोलीस नदी ठिकाणी फेरफटका मारुन केमिकल टाकणाऱ्यांचा शोध घेत आहेत . तर रात्रीच  अग्निशमन दलाने  उपस्थित होऊन फवारणी सुध्दा केली आहे .तेव्हा नेहमी नेहमी तेच म्हणुन उपाय योजना करन्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने अंबरनाथ व उल्हासनगर येथिल ५० कंपन्याना रेड झोन मध्ये जोडुन क्लोजर नोटीसा तर अंबरनाथ बदलापुर व सी ई टी पी ला सुध्दा नोटीसा पाठवल्या आहेत . परंतु या कंपन्यानी सदर नोटीसाना केराची टोपली दाखवत आपले उद्योग सुरुच ठेवले आहेत .

संबंधित पोस्ट