उल्हास नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने बंधारा बांधुन पाणी अडवले

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर शहराच्या बाहेरुन वाहणाऱ्या  उल्हास नदीचे  पाणी ठाणे, कल्याण डोंबिवली , मीरा भायंदर, भिवंडी, उल्हासनगर , अंबरनाथ  व बदलापुर या सर्व महापालिका  हद्दीतील ५०  लाख नागरिक  पितात, त्याच  उल्हास नदीत जवळपास १  लाख  घाणेरडे  पाणी, सांडपाणी, केमिकल युक्त पाणी,मल-मूत्र विसर्जन यांचे औउटलेट्स सोडलेले आहेत.  त्यामुळे  या पाण्यात जलपर्णी चे  अतिक्रमण झाल्याचे   दिसून येत आहे , त्या दूषित घटकांना नियंत्रित करण्यासाठी जलपर्णी चे  काढणे गरजेचे आहे . ही दूषित पातळी वाढून जसजसे जलपर्णी चे  अतिक्रमण वाढणार तसतसे नदी तील पाण्याच्या  पातळीत  घट होत चालली आहे, त्याच प्रमाणे नदी मध्ये गाळ सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला  आहे,

ज्या नदीत मासे सुद्धा जगत नाहीत त्या नदीचं पाणी, अंबरनाथ ते कल्याण ची जनता दर रोज पिण्यासाठी वापरतात, स्टेम प्राधिकरण , एमआय डीसी, सेंचुरी व अन्य पाणी पंपिंग  करुन फिल्टर करणाऱ्या  कंपन्या ना नदी च्या पाण्याची पातळी घटल्या मुळे शहाड जलउपसा केंद्रा जवळ    बंधारा बांधुन पाणी अड़वावे लागत आहे.

संबंधित पोस्ट