उल्हासनदी बचाव कृती समितीचे जलपर्णी सफाई अभियान .

उल्हासनगर(प्रतिनिधी): उल्हासनदी पात्रात वेगाने वाढणारी जलपर्णी ही मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे. जलपर्णीमुळे होणारे जलप्रदूषण व त्यापासून उध्दभवणारे  नाना प्रकारचे रोग यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक तरूण वयात मृत्यूमुखी पडत आहेत. या प्रदूषणामुळे बऱ्याच  नागरिकांना पोटाचे विकार व चमडीचे रोग होऊ लागले आहेत. उल्हासनदी चे वाढते जलप्रदूषण व जलपर्णी या विषयावर मागील बऱ्याच  वर्षांपासून उल्हासनदी बचाव कृती समिती सरकार दरबारी पाठपुरावा करीत आहे. त्याचबरोबर स्वत: स्वयंसेवका मार्फत उल्हासनदी बचावासाठी वर्षभर कार्यक्रम घेत असते. 

दरम्यान  १० जानेवारी २०२१ रोजी मोहना बंधारा, शहाड येथे उल्हासनदी बचाव कृती समिती मार्फत जलपर्णी काढण्यासाठी मोहीम राबवली गेली. ज्यामध्ये २ ते ३ टन जलपर्णी उल्हासनदी मधून काढण्यात आली आहे . यावेळी जलपर्णी मुळे ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झालेले जलचर पण आढळून आले. उल्हासनदी बचाव कृती समिती मार्फत या आठवडे भरात उल्हासनदी संबंधित सर्व सरकारी व खाजगी संस्था  जलसंपदा विभाग, एमआयडीसी, स्टेम प्राधिकरण व कल्याण डोंबिवली महापालिका यांना निवेदन दिले जाणार आहे, तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ जे उल्हासनदी च्या प्रदूषणासाठी जबाबदार आहे यांना उल्हासनदीचे प्रदूषित पाणी भेट दिले जाणार आहे. जेणेकरून प्रदूषणाची कारणे ते लवकर शोधून त्यावर कार्यवाही करतील.या मोहिमेत ३० ते ३५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता .

संबंधित पोस्ट