उल्हासनगरात मटक्यामुळे होतय गोरगरीबांच्या संसाराची राखरांगोळी .
- by Rameshwar Gawai
- Jan 09, 2021
- 1413 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) :उल्हासनगर मध्ये मटक्याचा धंदा जोरात सुरु आहे . या मटक्या वाल्याना रोखण्यात पोलिस यंत्रणा सपशेल अयशस्वी होताना दिसत आहे तर रोजंदारीवर काम करणारे २०० रुपये कमावुन त्यातील अर्धे अधिक पैसे मटक्यात गमावुन तोंड खाली घेवुन घरी येताना दिसत आहेत . त्यामुळे या मटक्याच्या नांदात गोर गरीबांचे संसार उघड्यावर पडले आहेत .
उल्हासनगर मध्ये कॅंप १ ते ५ मध्ये मटक्याचे धंदे बिनधास्त पणे सुरु आहेत . तर मटका लावणारे हे कंगाल होत असुन मटका चालक मात्र मालामाल होत आहे . कॅंप १ मधील शहाड च्या ब्रिज च्या खाली छोटु सावंत नावाच्या इसमाचा मटक्याचा धंदा जोरात सुरु आहे . तर कॅंप २ येथिल खेमाणी रोड वरील फक्कल मंडली येथे शंकर नावाचा इसम हा किराणा दुकानाच्या आड मटक्याचा धंदा करत आहे . दरम्यान कॅंप ३ येथिल साई बाबा मंदिराच्या मागे संम्राट अशोक नगर मध्ये देखिल मटक्याचा धंदा जोरात सुरु असुन या मटक्यावर पुरुषांच्या सोबतच महिलांची सुध्दा मटका लावायला वर्दळ असते . या मटक्याच्या धंद्यावर वस्तीतील नागरिकांसह बाहेर चे सुध्दा मटका खेळी येत असतात . सदर मटका लावणारे सर्व सामान्य नागरिक असुन रोजंदारीवर काम करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणारे आहेत तरी पण रोज कमावलेल्या पैशातुन अर्धे पैसे हे मटक्यात गमावत आहेत . तर कॅंप ५ येथिल मच्छी बाजारात सुध्दा मटक्या धंदा जोरात सुरु आहे . हे मटक्याचे धंदे बंद करन्यात पोलिस यंत्रणा अयशस्वी झालेली दिसत आहे . या मटक्या वाल्यांवर कारवाई होत नसल्याने हे मटक्याचे धंदे बिनधास्त पणे सुरु आहेत . मात्र या मटक्या पाई गोर गरीबांचे संसार उध्वस्त होताना दिसत आहेत
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम