उल्हासनगरातील सर्व संघटनाकडुन संघटीत रक्तदान शिबिरांच आयोजन .
- by Rameshwar Gawai
- Jan 08, 2021
- 689 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : कोविड महामारी मुळे सर्वत्र रक्ताची कमी निर्माण झाली आहे . त्यामुळे प्रत्येक जणानी रक्तदान करुन आपले कर्तव्य निभावले पाहिजे . त्यामुळे उल्हासनगरातील सर्व एन जी ओ आणि इतर सामाजिक संघटना यानी १० जानेवारी २०२१ रोजी संघटीत रक्तदान शिबीरांच आयोजन केल आहे . हे शिबीर कॅंप २ येथिल महाराष्ट्र मित्र मंडळ विद्यालयात होणार असुन सकाळी ९ ते ५ वाजेच्या दरम्यान होणार आहे .
उल्हासनगरात कोविडच्या महामारीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्ताच्या कमी मुळे बरेच रुग्ण दगावले आहेत दरम्यान शासनाने सुध्दा रक्तदान करण्याचे आव्हान नागरिकाना केले होते . तेव्हा शहरातील अनेक एन जी ओ आणि इतर सामाजिक संस्थानी रक्तदान करन्याचे प्रयत्न केले आहेत . तर १० जानेवारी रोजी शहरातील अनेक एन जी ओ आणि सामाजिक संस्था यानी संघटीत रक्तदान शिबीर आयोजित केले आहे . हे शिबीर उल्हासनगर कॅंप १ येथिल महाराष्ट्र मित्र मंडळ या विद्यालयात आयोजित केले असुन सकाळी ९ ते ५ वाजे पर्यंत हे शिबीर होणार आहे . या शिबीराला शहरातील नागरिकानी उपस्थित राहुन रक्तदान करन्याचे आव्हान पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी केले आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम