पत्रकार दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

उल्हासनगर(प्रतिनिधी) : पत्रकार दिनाचे औचित्य साधुन पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करन्यात आले असुन या शिबीराचा असंख्य नागरिकानी  लाभ घेतला आहे .तर या शिबीराला शहरातील अनेक मान्यवरानी भेट देवुन पत्रकारांचे अभिनंदन केले आहे . 

मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर  यानी ६ जानेवारी १८३२ साली दर्पण नावाचे वृत्तपत्र सुरु केले होते. त्यामुळे हा दिवस पत्रकार दिन  म्हणुन साजरा करन्यात येतो . तेव्हा या दिनाचे औचित्य साधुन पत्रकार सुरक्षा समिती उल्हासनगर तालुका यांच्या वतीने मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय संम्राट अशोक नगर उल्हासनगर ३ येथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करन्यात आले  होते . या शिबिरा मध्ये रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे संस्थापक व शिक्षण मंडळाचे माजी उप सभापती महादेव सोनवणे,आर  पी आय   (आठवले) चे प्रदेश सचिव नाना पवार . अशोका फाऊंडेशन चे अध्यक्ष शिवाजी रगडे युवा सेनेचे शहर अध्यक्ष बाळा श्रीखंडे.  कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष रोहित साळवे बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव प्रशांत  इंगळे वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे,महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ .  रेखाताई उबाळे,ज्येष्ट पत्रकार दिलीप मालवणकर, मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर  नगरसेवक गजानन शेळके, सेनेचे विभाग प्रमुख दशरथ चौधरी,पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे . जिल्हा महासचिव प्रदिप रोकडे माजी नगरसेविका  सुमनताई शेळके,पत्रकार सुरक्षा समिती बदलापुर चे अध्यक्ष भरत कारंडे यानी  सहभाग घेवुन पत्रकाराना शुभेच्छा दिल्यात . तर या प्रसंगी आलेल्या मान्यवरानी बाळशास्त्री जांभेकर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्पहार घालुन अभिवादन केले . दरम्यान या आरोग्य शिबीरा करिता मध्यवर्ती रुग्णालयाचे डॉ सतिश गंगावणे आणि त्यांचे सहकारी यानी आलेल्या अनेक महिला पुरुषांच्या आरोग्याची तपासणी केली.दरम्यान या शिबीराला आलेल्या प्रमुख पाहुन्यांचे पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष रामेश्वर गवई . कार्याध्यक्ष रमेश कांबळे,महासचिव गौतम वाघ . सचिव सुखनंदन गवई . उपाध्यक्ष सलिम मंसुरी,सहसचिव किरण तेलगोटे कोषाध्यक्ष जगन्नाथ  जावळे, सदस्य अशोक शिरसाट,यानी गुलाबाचे फुल देवुन स्वागत केले .

संबंधित पोस्ट