रिक्षावाल्याची माणुसकी क्षयरोग पिडीताला केले धान्य वाटप .
- by Rameshwar Gawai
- Jan 07, 2021
- 370 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : कोरोनाच्या लाँकडाऊनने सगळ्यांचेच अर्थशास्त्र बिघडवले. त्यात सर्वाधिक फटका बसला तो रिक्षा ड्रायव्हरला. रोज कमवून रोज खाणाऱ्या रिक्षा चालकांच्या रिक्षा ७ - ८ महिने बंदच असल्याने कुटुंबात उपासमार सहन करुनही आपल्या घासातला घास गरजूंना अनेकांनी दिला.
या काळात क्षयपिडीतांची मोठ्या प्रमाणात उपासमार होत होती. विनोद सपकाळे या सामान्य रिक्षावाल्याने मात्र या अडचणींत क्षयपिडीत रुग्णांना धान्यवाटप करून आपल्या दानत्वाची असामान्य माणुसकी दाखवली आहे .
जिल्हा क्षयरोग अधिकारी यशोमती कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली मोहीली क्षयरोग सूक्ष्मदर्शी केंद्र येेेथे हा धान्यवाटप वितरित करण्यात आले. याप्रसंगी ईंडियन सोशँलिस्ट रिपब्लिकन असो. ( ईस्राचे ) मुंबई उपनगर अध्यक्ष विनोद सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत उबाळे, बबलू पासवान हे प्रमुख अतिथी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या वसुंधरा गणेश मोरे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चंदन कांबळे, सतेज कांबळे, परिचारिका सुनिता, पी एच एन दिप्ती यांनी विशेष परिश्रम घेतले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम