
मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . सुधाकर शिंदे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते कोरोना योध्दा पुरस्कार .
- by Rameshwar Gawai
- Jan 05, 2021
- 543 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर येथिल मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यानी कोरोनाच्या महामारीत २४ तास काम करुन रुग्णाची सेवा केली तर ते स्वता कोरोना ग्रस्त असताना ही त्यानी हिमंत न हारता काम सुरुच ठेवले . तेव्हा त्यांच्या कार्याची दखल घेत राज्याचे कॅबिनेट व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यानी डॉ . सुधाकर शिंदे यांना कोरोना योध्दा हा पुरस्कार देवुन त्यांचा गौरव करन्यात आले आहे.
उल्हासनगर येथिल मध्यवर्ती रुग्णालयात डॉ सुधाकर शिंदे हे जिल्हा शल्य चिकित्सक पदावर आले तेव्हा पासुन या रुग्णालयात बऱ्याच सुधारणा घडुन आल्या आहेत . तर कोरोनाच्या प्रादुर्भावात डॉ शिंदे यानी घरदार सोडुन चोविस तास रुग्णालयात राहत होते . त्यामुळे त्याना सुध्दा कोरोनाची लागण झाली होती . तरी पण त्यानी कोरोनावर मात करुन पुन्हा ते रुग्णालयाच्या सेवेत दाखल झाले . म्हणुन शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्याना राज्याचे कॅबिनेट व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यानी डॉ . सुधाकर शिंदे याना कोरोना योध्दा पुरस्कार देवुन गौरविन्यात आले आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम