द बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून बौध्दधम्म परिषदेला उस्फुर्त प्रतिसाद.

उल्हासनगर(प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाला आणि मी संपूर्ण भारत बौध्दमय करीन या प्रेरणादायी संदेशाला अनुसरून बामसेफ प्रणित  द बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या भिक्खु संघाने चांगलेच मनावर घेतले असून देशभरातील अनेक राज्यात बौध्द धम्म परिषदेचे मोठ्या प्रमाणावर आयोजन आणि नियोजन करण्यात आले आहे.  त्याचाच एक भाग म्हणून  दि.३  जाने.२०२१  रोजी माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त  ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर कॅंप २ मधील भीमनगर येथे बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी सदर कार्यक्रमाला बौध्द बांधवां कडून मोठ्या प्रमाणात  प्रतिसाद मिळाला.

यावेळी आदरणीय भंते कश्यप यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून इतिहास काल, आज, आणि उद्याचा यावरून पडदा हटवून अज्ञानातीलअंधकारावर प्रकाश पाडून उपस्थित धम्म उपासक आणि उपासिका मध्ये नव चैतन्य निर्माण केले.

यावेळी द बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे महाराष्ट्र प्रभारी मा.भीमराव बोराडे यांनी सुरवातीला प्रस्तावना मांडली तर बुद्ध विहार समन्वय समितीचे विकास आठवले गुरुजी यांनी आपल्या शाब्दिक सुमनाने कार्यक्रमाचे उद्घघाटन केले.

तसेच बहुजन राष्ट्र समितीचे अध्यक्ष  सुनिलराज सैंदाणे , मानवाधिकार संघटनेच्या लताताई शिंदे, बामसेफ शहर अध्यक्ष आर डी खैरे आदी वक्त्यानी  आपल्या प्रमुख मार्गदर्शनातून उपस्थित उपासक उपासिकाचे प्रबोधन केले.  शेवटी मोकळ सर यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाचा   समारोप केला .

संबंधित पोस्ट