सावित्रीबाई फुले जयंती औचित्याने उल्हासनगरात सुरू झालीय.बिनघंटीची बोरूची शाळा
- by Rameshwar Gawai
- Jan 03, 2021
- 1021 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कायद्याने वागा लोकचळवळ आणि सहेर यांच्या संयुक्त विद्यमाने
झोपडपट्टी वस्तीतील आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी ' बिनघंटीची बोरूची शाळा ' यांचे उद्घाटन सोहळा मान्यवरां च्या उपस्थितीत उल्हासनगरातील आशेळे पाड्यात पार पडला.
आशेळे पाडा या परिसरात भंगारवेचक, मोलकरणी, नाका कामगार यांच्या वसाहती आहेत. यातील विद्यार्थ्यांंकडे स्मार्ट फोनचा अभाव असल्यामुळे लाँकडाऊन मध्ये अशा मुलांचा शालेय अभ्यास आँनलाईन अभ्यास मागे पडत होता. तसेच मुलांमध्ये भाषिक कौशल्ये, अभ्यासाची गोडी आणि सामाजिक जाणीवा व देशभावना जागृत होण्यासाठी कायद्याने वागा लोकचळवळ आणि सहेर या सामाजिक संस्थेने ' बिनघंटिची बोरुची शाळा ' केली असल्याचे
सोशल एक्शन फाॅर हेल्थ एन्ड एज्यूकेशन राईटस अर्थात सहेरचे सचिव व सुनील अहिरे यांनी सांगितलं.
टि एच आर महाराष्ट्र फेडरेशनच्या उपाध्यक्षा व सुप्रसिद्ध उद्योजिका जयश्री देशमुख यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैय्या थोरात, कायद्याने वागा लोकचळवळ संस्थापक, अध्यक्ष राज असरोंडकर, नायब तहसीलदार सुखदेव गवई, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पवार, अँड. स्वप्नील पाटील, आणि अँड. कल्पेश माने यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सुनील अहिरे असंघटित कष्टकरी कामगार संघटनेचेही अध्यक्ष आहेत. त्यामुळेच नाका कामगार, घरकामकागार कुटुंबांशी त्यांचा जवळचा संपर्क व संबंध आहे. तोच आमच्या या उपक्रमा तला सहभाग असेल, असं या उपक्रमासाठी आपली जागा उपलब्ध करून देणारे स्मार्ट फाऊंडेशनचे प्रफुल केदारे यांनी सांगितलं.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम