१९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी हुतात्मा वीर भाई कोतवाल पुण्यतिथी निमित्ताने आदरांजली.
- by Rameshwar Gawai
- Jan 02, 2021
- 1739 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आझाद दस्त्याची स्थापना करून आपल्या सहकार्यांच्या सोबतीने इग्रजांना सळो कि पळो करणारे भारताला जुलमी इंग्रज राजवटी पासून स्वातंत्र्य मिळावे याकरिता आपल्या प्राणाची आहुती देणारे क्रांतिकारक हुतात्मा अँड.विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या सिद्धगडावरील बलिदान दिनानिमित्त क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक स्मारक समितीच्या वतीने क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक,उल्हासनगर - ४ येथे त्यांच्या पावन स्मृतीला उजाळा देत आदरांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज कोरडे उपाध्यक्ष संदिप सायखेडे,श्री.संतसेना महाराज पतपेढीचे अध्यक्ष रामकिशन रावताळे तसेच नाभिक बांधव राजन चव्हाण, गौतम सोनावळे,संतोष खंडागळे,अंकुश श्रीखंडे, योगेश वाठ,सतीश बिडवे,भुषण सोनावळे, सतीश महाले,आमोल अंबुस्कर आणि पत्रकार किरण तेलगोटे . व सलिम मन्सुरी उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम