एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारी चौकडी सीसीटीव्हीच्या आधारे गजाआड.

उल्हासनगर(प्रतिनिधी) :  १  जानेवारी च्या रात्री अडीच वाजेच्या सुमारास विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन च्या हद्दीत सतरामदास हॉस्पिटल जवळ असलेल्या   ॲक्सिस  बँकेच्या  ए टी एम  मध्ये प्रवेश करून सदर ए टी एम  चे सेप्टी डोअर  आणि ए टी एम चे  पासवर्ड किट तोडून त्या मधून अज्ञात इसमानी पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता.  या प्रकरणी ॲक्सिस बॅंकेच्या मॅनेजर ने दिलेल्या तक्रारी वरुन   विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला  असुन  पोलिसांनी बँकेच्या सीसीटीव्ही फुटेज  सह आसपासच्या परिसरातील फुटेज तपासत त्यांना दोन आरोपी ए टी एम  बाहेर फिरताना दिसतात . आणि दोन आरोपी ए टी एम च्या  बाहेर येऊन पळताना दिसतात यावरुनच   या  चार आरोपींची पोलिसांनी लागलीच ओळख पटवली तर  खबऱ्यांनी दिलेल्या माहिती च्या आधारे या चौघांना आशेळेगाव परिसरात सापळा रचत  २४  तासात चारही  आरोपीना गजाआड केले आहे.   हे चार ही आरोपी  सराईत गुन्हेगार असून सागर सूर्यवंशी ,आशिष गौर ,केशव जगताप व रोहित कहार असे या आरोपीची नावे आहेत .

संबंधित पोस्ट