स्वर्गीय इजि . प्रणाली गवईला उमेद सामाजिक प्रतिष्ठानची शब्दांजली...

उल्हासनगर (प्रतिनिधी) :  प्रतिकूल परिस्थितीतुन आय टी अभियंता झालेल्या व उमेद सामाजिक प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा प्रणाली रामेश्वर गवई यांचे २० एप्रिल २०२० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते. लाँकडाऊन व संचार बंदीमुळे अभिवादन सभा घेता आली नव्हती. म्हणून ,उमेद  सामाजिक प्रतिष्ठान च्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने प्रणाली च्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सम्राट अशोक नगर, रमाबाई आंबेडकर विद्यालया जवळ उल्हासनगर ३ येथिल समाज मंदिरात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

या निमित्ताने, प्रणालीच्या  शैक्षणिक, सामाजिक व व्यक्तिगत संघर्षावर प्रकाश टाकणारे मनोगतं व्यक्त करण्यात आली. माजी उपमहापौर पंचशीला पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या  अभिवादन सभेत प्रणालीची जुळी बहीण हर्षाली रामेश्वर गवई, आर पी आय ( आठवले ) चे  प्रदेश सचिव नाना पवार, नगरसेवक गजानन शेळके, माजी नगरसेवक शांताराम निकम, सामाजिक कार्यकर्ते गौतम ढोके, रामेश्वर गवई,अंबादास पालवे,भारत आहिरे शिवाजी रगडे पत्रकार प्रफुल केदार अरुण अहिरे माणिक वानखडे गौरव धावारे . प्रभात दास राजदेव गुप्ता,रवि कदम,जीवन निकम  प्रमोद घनबहादुर,निलेश ढोके, गौतम गायकवाड  कैलास म्हात्रे, इंगळे गुरुजी यांनी प्रणाली बाबत च्या आठवणींना उजाळा दिला. तर यापुढे उमेद सामाजिक प्रतिष्ठानच्या  माध्यमातून प्रणालीच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी एका गरीब होतकरू विद्यार्थिनीच्या शिक्षणाकरीता शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेदच्या अध्यक्षा  नेहा पवार यांनी केले

संबंधित पोस्ट