
विठ्ठलवाडी पोलिसांची दारु विक्रेत्यांवर धडक कारवाई १०५ लिटर गावठी दारु जप्त,सात लोकांवर कारवाई.
- by Rameshwar Gawai
- Jan 01, 2021
- 847 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : विठ्ठलवाडी पोलिसानी वर्षा अखेरीस गावठी दारुच्या अड्ड्यावर धडक कारवाई करत आशेळे गावातील दारुवाल्याकडुन एकुण १०५ लिटर गावठी दारु जप्त करत सात लोकांना ताब्यात घेतले असुन त्याचेवर फौजदारी कारवाई केली आहे.
या धडक कारवाईत महेंद्र पाटील व राकेश पाटील यांचेकडुन रु.२००० किंमतीची २५ लिटर दारु ,संदिप इसरानी व संजय वर्मा यांचेकडुन रु.३०४० किंमतीची ३० लिटर गावठी दारु तसेच पंढरीनाथ तरे,दिपक जगताप व देवानंद बोधडे यांचेकडुन रु.४०४० किंमतीची ५० लिटर गावठी दारु अशी एकुण रु.९०८० किंमतीची १०५ लिटर गावठी दारु जप्त करुन एकुण सात लोकांना ताब्यात घेतले असुन त्याचेवर मुंबई पोलीस कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.यामुळे परिसरातील महिलांनी व नागरिकांनी आंनद व्यक्त करीत पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले आहे.
मात्र याच बरोबर एकीकडे गावठी दारुवर धडक कारवाई करत असलेले विठ्ठलवाडी पोलिस स्टेशन दुसरीकडे मात्र पोलीस स्टेशनपासुन जवळील हाकेच्या अंतरावर असलेल्या जुगार व मटका अड्ड्यावर जाणुन बुजून दुर्लक्ष करित आहे.सदर जुगार अड्डा हा सुर्या हाँटेल जवळीलस्टेशन बिस्किट कंपनी जवळ सुरु होता.या बाबत अनेकांनी तक्रारी दिल्या नंतर सदर जुगार व मटका अड्डा तेथुन हलवुन पोलिस स्टेशनच्या जवळ असलेल्या ममता कंपनी येथील भागिरचा पँलेसच्या मागील बाजुस,शिवनगर शिव सेना आँफीस समोरील गल्लीत तर दुसऱ्या ठिकाणी श्रीराम चौकातील गेट जवळ सर्रासपणे सुरु आहे.मात्र या बाबत विठ्ठलवाडी पोलिस अनभिज्ञ आहेत की ,जाणुन बुजून दुर्लक्ष करित आहेत या बाबत परिसरातील नागरिकातुन वेगवेगळे तर्क-वितर्क व्यक्त केले जात असुन आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम