पाण्याच्या टाकीत पडुन यशचा मृत्यु,या मृत्युची चौकशी करुन संबधितावर गुन्हा दाखल करा-रोहित साळवे.

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगरातील कॅप २ येथिल  रमाबाई आंबेडकर नगर परिसरात राहणारा आठ वर्षीय यश चा   कुकर कंपनीच्या मागे असलेल्या पडीत पाण्याच्या टाकीत चार दिवसांपूर्वी मृतदेह सापडला होता. हा मृत्यु पाण्याच्या टाकीत पडुन झाला नसुन त्याला कोणी तरी त्या टाकीत ढकलुन दिले असावे असा संशय निर्माण होत आहे.  तेव्हा यश च्या मृत्युची चौकशी करुन संबधितांवर गुन्हा दाखल करा.  अशी मागणी उल्हासनगर कॉंग्रेस चे जिल्हा अध्यक्ष  रोहित साळवे यानी उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम याना प्रत्यक्ष भेटुन केली आहे  . 

उल्हासनगर कॅंप २ येथिल रमाबाई आंबेडकर येथे राहणारा  यश भुजंग हा परिवारात एकुलता एक मुलगा होता . तो चार दिवसा पुर्वी अचानक बेपत्ता झाला . त्याचा सर्वत्र शोध घेवुन ही सापडला नसल्याने त्याच्या घरच्यानी उल्हासनगर पोलिस ठाण्यात यश हरवल्याची  तक्रार दिली . मात्र बाजुलाच असलेल्या कुकर कंपनीच्या पडीत असलेल्या पाण्याच्या टाकीत यश चा मृतदेह मिळुन आला . तो एकुलता एक असल्याने त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला .दरम्यान या  घटनेची माहिती काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे . कॉंग्रेस  सी ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके . तसेच कॉंग्रेस  नॉर्थ ब्लॉक अध्यक्ष सचिन गांधी व पदाधिकारी यांना कळताच त्यानी  त्या परिवाराची भेट घेतली. 

 साळवे यांनी मयत मुलाच्या घरच्यांची भेट घेत त्यांना धीर दिला आहे.   तर  उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांची  भेट घेऊन  या घटने संदर्भात सखोल चौकशी करण्याची  मागणी केली असुन यात जो ही जबाबदार असेल आणि   ज्या पाण्याच्या टाकीत पडून  यश चा मृत्यु   झाला होता ती टाकी कोणाची होती. याची सखोल चौकशी करावी तसेच यश च्या  मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या संबंधितावर कारवाई करावी.  अशी मागणी रोहित साळवे यांनी केली आहे . तर  मयत यशच्या  घरच्यांना मदतीचा हातभार देण्याचेही रोहित साळवे यांनी त्यांना आश्वासन दिले आहे .

संबंधित पोस्ट