नविन वर्षाचे औचित्य साधून राजे संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी बालकाना खाऊ व वह्या वाटप .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगरच्या शेजारी असलेल्या  रायतेगांव  येथिल  आदिवासी बालकांना शालेय  वस्तु व  खाऊ आणि वह्या राजे संस्कार प्रतिष्ठान च्या वतीने रायते गांवच्या माजी सरपंच गुलाबबाई वाघे यांच्या हस्ते  वाटप करन्यात आले आहेत .

नवीन वर्षाचे औचित्य साधत रायते गांवातील आदिवासी बालकाना राजे प्रतिष्ठान च्या वतीने शालेय साहित्य आणि वह्या व खाऊ यांचा वाटप रायते गांवच्या माजी सरपंच गुलाबबाई वाघे यांच्या हस्ते करन्यात आले असुन हा  कार्यक्रम  रोड रोलर चालक संस्थापक अध्यक्ष रशिद भाई शेख, रायते ग्रामपंचायचे माजी सदस्य मिलिंद चांदणे यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाला आहे .  

राजे संस्कार प्रतिष्ठान च्या सर्व टिमने  रायतेगांव  येथे येऊन आदिवासी  गरजु मुलांना शालेय  वस्तू वाटप केल्या बद्दल  रशीदभाई शेख व मिलिंद चांदणे यानी आभार माणुन  नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

संबंधित पोस्ट