बी आर एस पी पक्षाचे महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन .

उल्हासनगर(प्रतिनिधी) :  कोट्यवधींचा अर्थसंकल्प असूनही शहरा  तील गोरगरीब नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागते. शहरवासीयांच्या घामातून एकवटलेल्या कराचा पैसा लालची सत्ताधारी व प्रशासनाच्या घशात जात असून शहराचे वाटोळे  होत असल्याचा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टीचे उल्हासनगर शहराध्यक्ष हरेश ब्राम्हणे यांनी केला आहे. ते प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात  केलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाचे नेतृत्व करतांंना बोलत होते.

शहरातील शासकीय आरक्षित भूखंड राजकीय वरदहस्त लाभलेल्या माफियांकडून सातत्याने गिळंकृत होणे, बंद पडलेल्या परिवहन सेवेवर होणारा अतोनात अवास्तव खर्च,  महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांच्या अनुशेष भरतीचा प्रश्न , रखडलेली विकास कामे त्वरित मार्गी लावणे या सारख्या मागण्यांंसह बी आर एस पी चे कार्यकर्ते महापालिकेच्या मुख्यालयावर धडकले होते.

यावेळी शहराध्यक्ष हरेश ब्राह्मणे यांच्या सोबत अँड. राजेश कोळी, अविनाश नाईक, भिका खैरनार, विकास पवार, समाधान खरे, कुमार ब्राह्मणे, अँड  दीपक शहा यांनी महापालिका  उपायुक्त मदन सोंडे  यांना निवेदन सादर केले.

संबंधित पोस्ट