
टाटा आमंत्रा या कोविड सेंटर मधुन फरार झालेल्या आरोपीच्या मध्यवर्ती पोलिसानी आवळल्या मुसक्या .
- by Rameshwar Gawai
- Dec 30, 2020
- 992 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : भिंवडी येथील टाटा आमंत्रा या कोविड सेंटर मध्ये उपचारा करिता दाखल असलेल्या विलगीकरण कक्षातुन फरार झालेल्या आरोपीच्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत .
तीन महिन्यापुर्वी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहने आंबिवली लहुजीनगर येथे बायकोची हत्या केल्या प्रकरणी बाळु दशरथ खरात वय (४९) यांच्या विरोधात गु.रजि.नं.२०५/२०२० भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तेव्हा आरोपीला टाटा आमंत्रा या कोविड सेंटर मध्ये उपचाराकरीता विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्या विलगीकरण कक्षातून सदर आरोपी हा पोलीसांना चकमा देत फरार झाला होता, त्यासंदर्भात त्याच्या विरुद्ध कोनगाव पोलीस ठाण्यात गु.रजि.नं १६६/२०२० भा.द.वी. कलम २२४, १८८, २६९, १७१ साथरोग अधिनियम २,३,४ आपत्ती व्यवस्थापन ५१(ब) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने कोनगाव पोलीस त्याचा शोध घेत असतांना
उल्हासनगर मध्यवर्ती पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत खत्रीशीर माहिती मिळाली की सदर आरोपी हा १७ सेक्शन चौक येथे येणार आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंन्द्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणाचे स.पो.नि.कोकरे, पो.हवा.संजय बेंद्रे व त्याच्या पथकाला १७ सेक्शन येथे रवाना केले मिळालेल्या माहिती नुसार पोलीसांनी सापळा रचत हत्येच्या गुन्हातील फरार असलेल्या आरोपीला मध्यवर्ती पोलीसांना पकडण्यात यश आले आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम