
पत्रकार सुरक्षा समिती उल्हासनगर तालुका अध्यक्षपदी रामेश्वर गवई यांची नियुक्ती
- by Reporter
- Dec 30, 2020
- 1152 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने उल्हासनगर तालुका अध्यक्षपदी दैनिक आदर्श महाराष्ट्र चे रामेश्वर गवई यांची निवड करण्यात आली आहे .
गेली अनेक वर्षे आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून रोखठोकपणे लिखाण करणारे निर्भिड दैनिक आदर्श महाराष्ट्रचे रामेश्वर गवई यांची एकमताने पत्रकार सुरक्षा समिती उल्हासनगर तालुका अध्यक्ष पदी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंतराव पवार यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे.
या बैठकीत पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंतराव पवार आणि महासचिव डाॕ आतिषकुमार सुना, गौसखान पठाण रायगड जिल्हा अध्यक्ष . ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ढोंबरे ,सरचिटणीस प्रदीप रोकडे यांनी सर्व पत्रकार व सदस्य यांना मार्गदर्शन केले तसेच पुढील कार्यकारिणी घोषित केली उल्हासनगर तालुका कार्याध्यक्ष पदी दैनिक संध्याकाळ चे रमेश कांबळे,महासचिव गौतम वाघ दै.बातमीदार, कोषाध्यक्ष जगन्नाथ जावळे. उपाध्यक्ष सलिम मंसुरी दै.महाराष्ट्र सम्राट,सचिव सुखनंदन गवई दै.महानायक, सहसचिव किरण तेलगोटे स्टार महाराष्ट्र न्युज, तर सदस्य पदी राजू गायकवाड सिध्दांत गाडे. अशोक एफ शिरसाट ,किरण बनकर. सरफराज खान यांची निवड करण्यात आली.
रिपोर्टर