
मजुरीच्या मोबदल्याचा वाद,मालकाने केला कामगाराचा घात .
- by Rameshwar Gawai
- Dec 30, 2020
- 1750 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : मालक आणि कामगारात मजुरीच्या बाराशे रुपयांवरून वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, दोघा मालकांनी मिळून त्या कामगाराचा खून केल्याची धक्क्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भाटिया हॉस्पिटल जवळ उल्हासनगरच्या कॅम्प नं ५ भागातील लालसाई गार्डन परिसरात घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून दोघाही खुनी मालकांना अटक केली आहे. बंटी साबळे आणि राहुल घाडगे असे खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपी मालकांचे नावे आहेत. तर मनोज हटकर असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे.
मृतक मनोज हटकर हा रंगकाम काम करणारा कामगार होता. गेल्या काही दिवसांपासून आरोपी बंटी व राहुल मृतक मनोज एका ठिकाणी रंगकाम करीत होते. मात्र रंगकाम संपल्यावर मृतक मनोजने केलेल्या रंगकामाच्या मजुरी चे बाराशे रुपये आरोपी बंटी आणि राहुल यांच्या कडे होते . खबळजनक बाब म्हणजे मृत मनोजची आर्थिक तंगी असल्याने वारंवार पैशांची मागणी तो दोघां मालकाकडे करत होता , मात्र आरोपी बंटी आणि राहुल त्याकडे दुर्लक्ष करायचे. त्यातच सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मनोज आपली मजुरी मागण्यासाठी पुन्हा एकदा या दोघांच्या घरी गेला. त्यामुळे पैसे मागण्यासाठी मनोज घरी आल्याने याचा दोघांना राग आला. त्यामुळे त्या दोघानी मनोजला दांडक्याने बेदम मारहाण करीत त्याचा खूनच करुन टाकला .
याप्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात बंटी आणि राहुलच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. आता पोलीस नक्की मजुरीच्या पैश्याच्या वादातून खून झाला की खुना मागे आणखी काही कारण आहे, याचा शोध घेत आहेत.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम