पोलीस कर्मचारी व कुटुंबियांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबीर संपन्न ; ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचा स्तुत्य व सामाजिक उपक्रम

ठाणे (पंकजकुमार पाटील )  : ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे  राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा.प्रकाश डोंगळे , राष्ट्रीय उपाध्यक्ष-मा.धमेन्द्र अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्री. अनंत हुमणे, उपाध्यक्ष:- श्री.दाजीसाहेब थोरात,  महाराष्ट्र राज्य सहसचिव  विनायक जयकर, अंबरनाथ शहर अध्यक्ष  संतोष क्षेत्रे,ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख जनार्दन गुरव व पदाधिकारी आणि सदस्य यांच्या उपस्थिती मध्ये दि २७  डिसेंबर रोजी  बदलापूर (पूर्व) पोलीस स्टेशनमध्ये  समस्त  पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरिता ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत व मेडलाईफ फौंडेशन तर्फे  मोफत आरोग्य  शिबीर राबवण्यात आले . यावेळी  पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख साहेब व पोलीस कर्मचारी यांनी चांगले  सहकार्य केले व प्रतिसाद दिला.  या शिबिराचा लाभ अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी घेऊन संघटनेचे कौतुक केले. 

 बदलापूर येथे पार पडलेल्या शिबिरानंतर  अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे  सी.पी. ऑफिस याठिकाणी  शिबीरे  घेतले जातील असे ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनंत हुमणे यांनी सांगितले. ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना  पोलीस बांधवाना नेहमी  सहकार्य करून बंदोबस्तच्या वेळी सुद्धा वेळोवेळी मदत करेल हेदेखील ते पुढे म्हणाले.

संबंधित पोस्ट