अनधिकृत बांधकामांमुळे जेष्ठ नागरिकाचे आरोग्य धोक्यात .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर हे शहर मा. उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामांचे शहर म्हणून घोषित केले व हे शहर नेस्तनाबूत करण्याचे आदेश दिले होते. यानंतरही, सर्वाधिक अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या प्रभाग क्रं १ मधिल, शिवाजी रोड ,शहाड फाटक, अमिर मंजील येथील जामा मस्जिद शेजारी होत असलेल्या अनधिकृत बांधकामामुळे एका जेष्ठ नागरिकांची प्रक्रुती ढासळत असल्याची तक्रार त्यांचा मुलगा शाबिर खान यांनी केली आहे. 

शाबिर यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या घराला लागुनच अश्फाख कुरेशी यांनी दुमजली टि गेटर चे बेकायदेशीर बांधकाम करीत आहे.  यामुळे वहिवाटीची गल्लीस अडथळा निर्माण होत आहे. समोरच अमीर खान या ८० वर्षीय जेष्ठ नागरिक यांच्या घराच्या दोन्ही खिडक्या या बांधकामामुळे बंद झाल्या आहेत. अमिर यांना दोनदा ह्रदयविकाराचे झटके येऊन त्यांची  अँजिओप्लास्टी झाली आहे. खिडकी बंद झाल्याने त्यांना सुर्यप्रकाश व खेळती हवा येणे ठप्प झाल्याने श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागला आहे.

राज्य सरकारच्या मध्यस्थी नंतर  २००५ उल्हासनगर महानगरपालिकेने शहरात एकही नवीन बेकायदेशीर बांधकाम होऊ देणार नाही असे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले होते. तरी यानंतरही, शहरात अनधिकृत बांधकामं थांबण्याचे नाव घेत नाही

प्रभाग क्र १ मध्ये अधिक्याने अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. याप्रकरणी, शाबिर खान यांनी संबधीत प्रभाग अधिकारी अजय ऐडके, उपायुक्त मदन सोंडे, अति. आयुक्त डॉ करुणा जुईकर तसेच नगररचना विभागाचे सचिव महेश पाठक यांना रितसर तक्रारी केल्या आहेत. परंतु, प्रशासनाकडून होत असलेल्या टंगळमंगळ पाहता आपल्या आजारी वडिलांसह मुख्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे शाबिर खान यांनी सांगितले आहे.

संबंधित पोस्ट