भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा खर्डी नं.१ची अभिमानास्पद वाटचाल


शहापुर(महेश धानके) निती आयोग भारत सरकार व्दारा प्रायोजीत BRICSMATH COM  गणित आंतरराष्ट्रीय दर्जा च्या परीक्षेत जगातील रशिया, भारत, ब्राझिल, चायना,साऊथ आफ्रिका, इंडोनेशिया, व्हियतनाम या देशातील ५०लाखापेक्षा अधिक विद्यार्थीया परीक्षेत दरवर्षी बसतात.सदर परीक्षा १६ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या  कालावधी आँनलाईन पध्दतीने झाली.

या वर्षी ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा खर्डी नं. १ चे इयत्ता पहिली ते पाचवी चे एकुण २२  विद्यार्थ्यी सदर  परीक्षेत सहभागी होऊन आँनलाईन पध्दतीने शाळेत  ५ डिसेंबर रोजी  लँपटाँप तथा मोबाईल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली . सदर परीक्षा ८० गुणांची असुन परीक्षा कालावधी १ तासाचा होता. 

सदर परीक्षेचा निकाल २३ डिसेंबर रोजी   BRICSMATH COM या त्यांच्या वेबसाईटवर जाहीर झाला असून   भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा खर्डी नं.१  चे ५ विद्यार्थी winner लेव्हल  तर १३ विद्यार्थी Achievement लेव्हल ने उतिर्ण झाले .

सदर परीक्षे संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुधीर भोईर सर यांनी मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले व जगातील इत्तर देशांच्या मुलांच्या जोडीला आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करुन दिली.

संबंधित पोस्ट