
उल्हासनगरात युवासेनेचा मेळावा संपन्न .
- by Rameshwar Gawai
- Dec 28, 2020
- 2102 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) :उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत एक हाती सत्ता आणण्यासाठी युवासेनेचा वाटा महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन युवासेनेचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी उल्हासनगर मधिल पदाधिकारी मेळाव्यात केले आहे.
शहाड फाटक,सी.ब्लॉक रोड,गुरूद्वारा हॉल उल्हासनगर कॅंप १ येथे युवासेना शहराच्या वतीने युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . त्या प्रसंगी युवासेना उपजिल्हाधिकारी दिपेश म्हात्रे यांच्या आदेशाने उल्हासनगर विभाग १/२/३ मधील उपविभागअधिकारी,शाखाधिकारी, उपशाखा अधिकारी, नवनियुक्त पद्धधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच युवासेनेच्या दिंनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा करण्यात आला.
युवासेना प्रमुख. पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य मा.आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरुण सरदेसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हा अधिकारी, नगरसेवक दिपेशजी म्हात्रे उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी. युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य योगेशजी निमसे,युवासेना संभाजी नगर विस्तारक निखिल वाळेकर,तसेच युवासेना विस्तारक परिक्षीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली युवासेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे यांच्या वतीने युवासेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
युवासेना जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी युवकांना संबोधित करताना सांगितले की लॉकडाउन नंतर पहिला युवासेना मेळावा हा उल्हासनगर शहरात झाला असून उल्हासनगर महानगरपालिकेत एकहाती सत्ता आणण्यासाठी युवासेनेचा वाटा महत्वाचा असून घर तिथे युवासैनिक,बुथ तिथे युथ असायलाच पाहिजे. शिवसेनेचे खासदार, आमदार, मंत्री जे काम करत आहेत ते जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम आपण केले पाहिजे.
शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी यावेळी आपल्या मनोगतात सांगितले की युवासेनेच्या माध्यमातून वेळोवेळी चांगले काम घडत असून यापुढे घराघरात युवासैनिक तयार कसा होईल यासाठी जोमाने कामाला लागा शिवसेनेची गरज ज्यावेळी तुम्हाला लागेल त्या ठिकाणी शिवसेना तुमच्या पाठिशी उभी राहिलच पण नुसते पद घेऊन बँनरबाजी करण्यापेक्षा आपल्या प्रभागात काय समस्या अडचणी आहेत ते काम करण्यावर भर द्या. असे सांगितले.
यावेळी प्रमुख उपस्थिती दिपेश म्हात्रे युवासेना जिल्हाधिकारी, राजेंद्र चौधरी शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक, योगेश निमसे युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य,परिक्षित पाटील युवा सेना. युवासेना विस्तारक,निखिल वालेकर युवासेना उपजिल्हाधिकारी, राजेंद्र शाहू शिवसेना उपशहरप्रमुख,भुल्लर महाराज शिवसेना ज्येष्ठ नगरसेवक, सागर उटवाल सोशल मीडिया अध्यक्ष, बाळा श्रीखंडे युवासेना शहर अधिकारी,राजेश कणसे युवासेना शहर समन्वयक,रमेश कांबळे सचिव युवासेना, सुरेश सोनवणे,शिवसेना विभाग प्रमुख, रवि निकम युवासेना सरचिटणीस,युवासेना उपशहर अधिकारी ज्ञानेश्वर मरसाळे, जावेद शेख पप्पू जाधवयुवा सेना विभाग अधिकारी रुपेश मोहिते, हरी पवार सर्व युवासेनेचे उपविभाग अधिकारी, शाखा अधिकारी उपस्थित होते
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम