
मद्यमान करुन वाहन चालवाणाऱ्यांवर होणार कारवाई
- by Rameshwar Gawai
- Dec 28, 2020
- 1227 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर . अंबरनाथ व बदलापुर येथिल मद्यपीना वाहतुक पोलिस चांगलाच धडा शिकवणार आहेत . मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर वाहतुक पोलिसांची करडी नजर असणार आहे . या साठी नव्याने रजु झालेले सहायक पोलिस आयुक्त ( वाहतुक विभाग ) दत्ता टोटेवाड यानी चांगलीच फिल्डींग लावली आहे जो ही वाहन चालक मद्यपान करुन वाहन चालवताना आढळुन आला तर त्याच्या मुसक्या आवळुन त्याला न्यायालयात हजर करन्यात येणार आहे . त्यामुळे मद्यप्यानी नवीन वर्षाच्या आगमना वेळी सांभाळुन रहा असा इशारा वाहतुक विभागाने दिला आहे .
नुकताच ख्रिसमस होवुन गेला आहे . तर आता नवीन वर्षाच्या आगमनाला तीन दिवस बाकी आहेत . त्यामुळे सुट्ट्यांचा लाभ घेत तळीराम मजा मारतात . तर नवीन वर्षाचा आनंद लुटन्या करिता हे मद्यपी हॉटेल रिसॉर्ट ढाबे येथे जावुन मौज मजा करतात . दरम्यान सर्वत्र नाईट कर्फ्यु असल्याने ढाबे वाले हे चोरुन मद्यपीना रसद पुरवतात . तेव्हा अशा ढाबे वाले हॉटेल यांच्यावर वाहतुक विभागाची करडी नजर असणार आहे . दरम्यान उल्हासनगर वाहतुक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त दत्ता टोटेवाड यांच्या मार्गदर्शना खाली उल्हासनगर वाहतुक विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीकांत धरणे . अंबरनाथ वाहतुक विभागाचे पोलिस निरीक्षक सुनिल जाधव व बदलापुर वाहतुक विभागाचे पोलिस निरीक्षक शहाजी शितोळे यानी या तिन्ही ही शहरात चांगलीच फिल्डींग लावली आहे . यानी आता पर्यंत ३२ मद्यपींवर गुन्हे दाखल केले असुन आता त्याना न्यायालयाच्या चक्करा माराव्या लागणार आहेत . म्हणुन मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येइल असा इशारा वाहतुक विभागाने दिला आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम