निस्कृष्ट दर्जाचे होत असलेल्या समाज मंदिराचे बांधकाम थांबवा . निलेश पवार यांची मागणी .

उल्हासनगर(प्रतिनिधी)  :उल्हासनगर  महानगरपालिका पँनल १८  ब . मध्ये लोक शाहीर अण्णा भाऊ साठे दलित वस्ती  निधीतून बाधण्यात येत असलेल्या  समाजमंदिराचे बाधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने ते बांधकाम थांबवुन संबधित ठेकेदारावर  कारवाई करण्याची मागणी  वनवा समता परिषदेने अध्यक्ष निलेश पवार यानी महापालिका  आयुक्तांकडे   केली आहे. 

 उल्हासनगर महानगरपालिकेच्या पँनल नं १८ब मधिल महात्मा फुले नगर उल्हासनगर ५ ,येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे दलित वस्ती निधीतून  समाज मंदिर चे बांधकाम  करण्यात येत असुन सदर बांधकाम  हे आर.सी.सी असल्याने बांधकाम  करण्यासाठी फाऊंडेशन व पिलर मध्ये रेती तसेच १ व २  ची खडी आणि सिमेंट बंधनकारक असल्याने  सदर ठेकेदार बाधंत असलेल्या  बांधकामात  फाऊंडेशन व पिल्लर मध्ये सर्रास पणे ग्रिट चा वापर पुर्ण करत असल्याचे स्पष्ट दिसत असून सदर ठेकेदार बांधत  असलेल्या समाज मंदिरा  चे संपुर्ण बांधकाम हे नित्कृष्ठ दर्जाचे असल्याने  सदरील बांंधकाम त्वरित  थांबवन्यात  यावे आणि  संबंधित   ठेकेदारावर कारवाई करून त्या ठेकेदाराला  काळ्या यादीत टाकुन  व या बांधकामाला जबाबदार असणाऱ्या  सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता  व बिट मुकादमावर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे  निवेदन    वनवा समता परिषदेचे अध्यक्ष निलेश पवार  यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांना दिले आहे.

संबंधित पोस्ट