
सेंच्युरी स्कुल शहाड उल्हासनगर येथे रंगली माणुसकी ची भिंत.उल्हास नदी बचाओ समिती कार्यकर्ते समाजसेवेत सक्रिय.
- by Rameshwar Gawai
- Dec 24, 2020
- 1220 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : स्व.रोहित भोईर स्मरणार्थ उल्हासनगर येथील शहाड येथे माणुसकीची भिंत हा उपक्रम राबविन्यात आला आहे.
कल्याण तालुक्या मधील आश्रम आणि आदिवासी पाडे या ठिकाणी जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या पर्यंत हे कपडे पोहचले जाणार आहे. आपले ब्रीद वाक्य हेच आहे की. नको असेल तर द्या. हवे असेल तर घेऊन जा. खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी या उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. दोन दिवसात जवळ पास २०० कपड्यांचे संकलन करण्यात आले आहे. आणि वाढती थंडी मुळे जे गोरगरीब जनतेला थंडी पासून बचाव करण्यासाठीचा प्रयत्न म्हणून येत्या २५ डिसेंबर ला देखील ब्लँकेट डे साजरा करण्यात येणार असून शहाड, उल्हासनगर, कल्याण स्टेशन वर रोड वर झोपणाऱ्या लोकांना ब्लँकेट वाटप करणार असून माणुसकीचा सलून हा उपक्रम गेल्या २ वर्ष पासुन सुरु आहे.
कल्याण अंबरनाथ उल्हासनगर टिटवाळा, ग्रामीण भागातील आदिवासी पाडे या ठिकाणी जाऊन दर वर्षी २५०० लोकाचे मोफत केस कटिंग केले जाते, आणि उल्हासनदी बचाव कृती समिती अंतर्गत उल्हासनदी वाचवा साठीचे आंदोलन असो या स्वच्छ्ता अभियाना मध्ये मोलाचे योगदान आणि उल्हासनदी वर असलेले अतूट नाते. तसेच माणुसकीची भिंत,तसेच माणुसकीचे कार्यालय २४ तास लोकांच्या मदती साठी लवकरच चालु होणार आहे. या मध्ये सामजिक शैक्षणिक मेडिकल इतर अत्यावशक गरज लागल्यास या कार्यालय मधून लोकांना मदत केली जाईल. असे अनेक सामाजिक उपक्रम या पुढे रबिवला जाणार आहे अशी माहिती उल्हास नदी बचाओ समिती पदाधिकारी श्री अश्विन भोईर यानी दिली.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम