आयुक्त डॉ राजा दयानिधी साहेब आशा सेविकांची ही दया येऊ द्या .नगरसेविकेची आर्त हाक .

उल्हासनगर(प्रतिनिधी):   कोरोना काळात स्वतःच्या जीवाची  व कुटुंबाची पर्वा न करता नाममात्र मानधनावर आयुक्तांच्या आदेशानुसार कोरोना रुग्णांचे सर्वेक्षणाच्या  जोखमीचे काम आशा सेविका यानी  केले.  मात्र  त्यांना मिळणारं ३३   रुपये प्रतिदिन मानधन हे त्यांच्या सेवेच्या तुलनेत अत्यल्प आहे हे स्वतः पालकमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी  कबुल करुन हे मानधन ३०० रुपये करण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. यावर  आयुक्तांनी ते तातडीने अदा करण्याचे लेखी आदेशही काढले . एवढेच  नव्हे तर स्थायी समितीने मंजुरी देखील दिली आहे . मात्र अद्याप पर्यंत त्या आशा सेविकाना त्यांचे मानधन मिळाले नाही . म्हणुन आयुक्त डॉ . राजा दयानिधी आपण या आशा सेविकांवर दया करुन त्याना त्यांचे मानधन द्या अशी आर्त हाक नगरसेविका सौ  सविता तोरणे - रगडे यानी आयुक्ताना दिली आहे .  

उल्हासनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिके मध्ये आशा सेविकांचे काम करणाऱ्या महिला ह्या स्वताचा जीव आणि परिवाराचा जीव धोक्यात घालुन हॉटस्पॉट असलेल्या परिसरात जावुन रुग्णांचे सर्वेक्षण . त्याच्या तपासण्या करुन नोंदणी करन्याचे काम यानी केले . या कामाचे त्याना फक्त ३३  रुपये प्रतिदिन ऐवढेच मानधन मिळत होते . परंतु हे मानधन अल्प असल्याचे समाजसेवक शिवाजी रगडे यानी पालक मंत्री मा . एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणुन दिले तेव्हा मंत्र्यानी या आशा सेविकाना प्रतिदिन ३०० रुपये मानधन देन्याच्या सुचना आयुक्ताना दिल्या होत्या . तर आयुक्तानी आदेश काढुन ३०० रुपये अदा करन्याचे निश्चित केले होते . परंतु अद्याप पर्यंत याना त्यांचे ४२ दिवसाचे ३०० रुपये या प्रमाणे मानधन मिळाले नाही  तर सदर मानधन मिळावे या बाबत स्थायी समिती मध्ये सुध्दा ठराव मंजुर झाला आहे . तरी देखिल त्याना आता पर्यंत मानधन मिळाले नाही .  मात्र, प्रशासनाचे हे मानधन आशा सेविकाना  ना देण्यात स्वारस्य का कमी होत गेले ठाऊक नाही. मात्र यासाठी नगरसेविका सौ सविता तोरणे - रगडे हे सुरवात पासुन पाठपुरावा करत आहेत . 

मात्र, अखेरीस महापालिका  प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्या  मार्फत आशा सेविकांच्या  वाढिव मानधनाच्या नस्तीवर अनेक कागदी घोडे नाचवल्याने आता मी व आशा सेविका  अक्षरशः हताश झाले  आहे. तरी, आयुक्तांना माझी आग्रहाची विनंती आहे. की आपण यात स्वतः जातीने लक्ष घालुन तातडीने या प्रश्नांची सोडवणूक करावी. आणि, आशा सेविकांचे  थकित वाढिव मानधन त्वरीत अदा करण्यासाठी संबंधितांना आदेशित करावे. अशी आर्त हाक नगरसेविका तोरणे यानी आयुक्ताना दिली आहे . जर याना लवकरात लवकर मानधन दिले नाही तर उपोषणाला बसन्याचा ही इशारा नगरसेविका यानी आयुक्ताना दिला आहे .

संबंधित पोस्ट