मनविसेच्या शहर अध्यक्षावर हल्ला करणाऱ्या आरोपींची नार्को टेस्ट करा .

उल्हासनगर(प्रतिनिधी): उल्हासनगर मनविसे चे शहर अध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर अडीच महिन्या पुर्वी मॉर्निंग वाक करताना तलवारीने हल्ला झाला होता . तेव्हा या हल्ल्या प्रकरणी चार आरोपीना शिवाजी नगर पोलिसानी अटक केली आहे.  तर मनोज शेलार कोण आहे हे दाखवणारा महापालिकेचा अधिकारी सचिन वानखडे याला देखिल अटक झाली आहे.  परंतु या हल्ल्यातील प्रमुख सुत्रधार कोण आहे याचा  शोध घ्या किंवा या आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी मनोज शेलार यांचे वडील महादेव शेलार यानी राज्याचे गृहराज्य मंत्री सतेज पाटील याना निवेदनाद्वारे केली आहे . 

उल्हासनगर मनविसे चे शहर अध्यक्ष मनोज शेलार हे ८ ऑक्टोंबर रोजी अंबरनाथ येथिल गोविंद तिर्थ पुलावर मॉर्निग वाक करत असताना त्यांच्या वर चार जणानी तलवारीने हल्ला केला होता . तेव्हा या हल्ल्यातील साजिद मोहम्मद अकिल शेख . दिपक तिवारी . गोव्हित इंद्रा कांबळे . व अक्षय गिरी या चार आरोपीना शिवाजी नगर पोलिसानी अटक केली . तेव्हा या आरोपीना  मनोज शेलार कोण आहे हे महापालिकेतील अधिकारी सचिन वानखडे याने दाखवल्याने त्याला उल्हासनगर गुन्हे अन्न्वेषण च्या पोलिसानी अटक केली असुन मात्र या हल्ल्या तील खरा सुत्रधार हा वेगळाच आहे . म्हणुन या खऱ्या आरोपीचा शोध घेन्या करिता आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी मनोज शेलार यांचे वडील महादेव शेलार यानी राज्याचे गृहराज्य  मंत्री सतेज पाटील याना निव्वेदनाद्वारे केली आहे . दरम्यान मनोज शेलार यांच्यावर हल्ला करन्यासाठी ८० हजार रुपयाची सुपारी सुध्दा दिल्याची कबुल या आरोपीनी दिली आहे

संबंधित पोस्ट