नरभक्षक वाघिणीला ठार केल्यामुळे मनेका गांधी संतापल्या: आदित्य ठाकरेनेंही व्यक्त केली नापसंती
- by Adarsh Maharashtra
- Nov 05, 2018
- 1055 views
नरभक्षक वाघिणीला ठार केल्यामुळे मनेका गांधी संतापल्या
चंद्रपुरातील ‘अवनी’ वाघिणीला ठार केल्यानंतर भाजप नेत्या आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘या प्रकरणी मी राजकीय आणि कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे,’ असंही मनेका गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.‘वाघिणीची हत्या केल्याने मी खूप दु:खी झाली आहे. चंद्रपुरात शहाफत अली खान यानं आतापर्यंत 3 वाघ, 10 बिबट्या, अनेक हत्ती आणि जवळपास 300 रानडुकरांची हत्या केली आहे. अशा माणसाला तुम्ही अमानवी कृत्य करण्यासाठी कसं काय नेमू शकता,’ असा सवाल राज्य सरकारला विचारत मनेका गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.
आदित्य ठाकरेनेंही व्यक्त केली नापसंती
‘वन खात्याचं नाव
बदलून शिकारी खातं असे करायला हवे’ अशी टीका टी-1 वाघिणीला ठार
मारल्याप्रकरणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी
ट्वीटरवरून वन मंत्रालयावर केली आहे.वाघिणीला मारण्याची न्यायालयाकडून
परवानगी होती का? तिला बेशुद्ध करून पकडता आलं नसतं का? एक वन्यजीवप्रेमी
म्हणून आपल्याला पडलेले हे प्रश्न आहेत. मात्र आज अवनीला ठार केलं. उद्या
तिच्या बछड्यांचा किंवा आणखी दुसऱ्या वाघाचा बळी घेतला जाईल, असा असा
आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
संबंधित पोस्ट
Support US
विश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.
सहभाग निधी साठी इथे क्लिक करा
Support US
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम