अखेर भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक अभ्यासकेंद्र विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी खुले .

उल्हासनगर(प्रतिनिधी): उल्हासनगर  महानगर पालिकेचे  भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांना अभ्यासा साठी तात्काळ खुले  करण्यात यावे  या साठी मनसे च्या वतीने  महापालिका प्रशासनाकडे  सतत पाठपुरावा केल्यानंतर आज अखेर हे शैक्षणिक अभ्यास केंद्र खाली करण्यात आले  असून विद्यार्थ्यांना लवकरच या अभ्यासकेंद्रात अभ्यास करता येणार आहे. 


गेल्या काही महिन्या  पासून या अभ्यास केद्राला कोविड केअर सेंटर  करण्यात आले  होते . परंतु आपल्या शहरातील रुग्ण संख्या बऱ्या पैकी आटोक्यात आल्यामुळे या अभ्यासिकेत असलेले थोडे फार रुग्ण इतर ठिकाणी हलवून हे अभ्यासकेंद्र विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी खुले  करावे  यासाठी मनसे व मनविसे ने उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डाॕ.राजा  दयानिधी यांची भेट घेऊन हे अभ्यासकेंद्र विद्यार्थ्यांसाठी खुले  करावे  अन्यथा २३ डिसेंबर रोजी आयुक्त कार्यालया बाहेर आंदोलनाचा इशारा दिला होता.


ही अभ्यासिका कोविड सेंटर साठी  दिल्या मुळे युपीएससी  / एम पी एस सी  तसेच इतर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे जागे अभावी प्रचंड हाल होत आहेत.  ही बाब शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिली होती. युपीएससी / एम पी एस सी  च्या विद्यार्थ्यांनी स्वतः मनसे शिष्टमंडळा बरोबर आयुक्तांची भेट घेऊन आमच्या अभ्यासाच नुकसान होतय ही बाब सुध्दा विद्यार्थ्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती.व या विद्यार्थ्यांना होणाऱ्या असुविधेचा विचार करुन ही अभ्यासिका विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तात्काळ खुली करुन दयावी अशी मागणी बंडू देशमुख व मनोज शेलार यांनी आयुक्तांकडे केली होती.यावेळी उपजिल्हा सचिव संजय घुगे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख, मनविसे शहर अध्यक्ष मनोज शेलार , उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके,मुकेश सेठपलानी, मनविसे सचिव सचिन चौधरी, तन्मेश देशमुख, विभाग अध्यक्ष अनिल गोधडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट