उल्हासनगर महापालिकेने ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांचे पी एफ फंडाचे पैसे वसुल न केल्याने महापालिकेचे खाते सील.
- by Rameshwar Gawai
- Dec 21, 2020
- 608 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर महानगरपालिकेने ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम ( ईपीएफ) वसूली न केल्याने उल्हासनगर महानगरपालिकेचे स्टेट बैंक ऑफ इंडिया ने खातेच सिल केले आहे . मी वेळो वेळी उल्हासनगर महानगर पालिकेच्या निदर्शनास आणुन दिले होते की काही ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे भरन्याचे रिकॉर्ड चेक करा परंतु या कडे महापाकिकेने दुर्लक्ष केले आहे त्यामुळे ईपीएफ विभागाने ६० कोटी रिकवरीची नोटीस महापालिकेला बजावली आहे. तर ६० कोटी भरले नसल्याने स्टेट बैंक ऑफ इंडिया ने महानगरपालिकेचे खातेच सिल केले आहे अशी माहीती माजी स्थायी सभापती राजेश वधारिया यानी दिली आहे .
उल्हासनगर महापालिके मध्ये बरेच ठेकेदार आहेत . तर त्या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे कटिंग होत असतात . परंतु महापालिकेने आता पर्यंत एका ही ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांचे ईपीएफ फंडाचे पैसे जमा करुन ते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा केले नाहीत. या बाबत माजी स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यानी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला आहे . त्यानी या बैठकीत शुभम कंट्रक्सन कंपनी व काही ठेकेदार यानी आपल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे पैसे महापालिकेत जमा केलेच नाही त्यामुळे महापालिकेला ६० कोटी रुपये रिकवरीची नोटीस भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने बजावली आहे . म्हणुन स्टेट बॅंक ऑफ इंडियाने महापालिकेचे खातेच सिल केले आहे . त्यामुळे महापालिकेची इभ्रत चव्ह्याट्यावर आली आहे .तर महापालिका ही प्रिंसीपल एंप्लायर असल्याने ठेकेदाराने पैसे भरले किंवा नाही याची शहानिशा करुन सर्व पैसे आता महापालिकेला भरावे लागणार आहेत . अस ही वधारिया यानी सांगितले आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम