असा ही माणुसकीचा सलुन.
- by Rameshwar Gawai
- Dec 20, 2020
- 724 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर जवळ असलेल्या वरपगांव येथे भूषण सोनवणे या युवकाचे सलुनचे दुकान आहे. हा युवक आपला व्यवसाय करून समाजाला आपलं काही देणं लागतं या उद्देशाने राईट्स ऑफ वुमेन(आईची सावली ) या लहान मुलांच्या अनाथ आश्रमात जावुन त्या मुलांचे केस गेल्या काही महिन्या पासुन मोफत कापुन देत आहे . त्यामुळे हा एक माणुसकीचा सलुन म्हणुन नावारुपाला आला आहे .
उल्हासनगर शहराजवळ असलेल्या वरपगांव येथे भूषण सोनवणे यांचे सलुन चे दुकान असुन हा युवक गोर गरीब याना नेहमी मदत करतो . त्याने आपण समाजाच काही तरी देण लागतो या भावनेतुन त्याने गुरवली येथे असलेल्या राईट्स ऑफ वुमेन ( आई ची सावली ) या अनाथ मुलांच्या आश्रमात जावुन तेथे असलेल्या तीस मुलांचे गेल्या काही महिन्या पासुन मोफत केस कापुन देत आहे . तर उल्हासनगर . कल्याण . अंबरनाथ येथे असलेल्या आश्रमात ही सेवा देन्याचा भूषण सोनवणे यांचा मानस आहे . त्यामुळे हा सलुन वाला माणुसकीचे सलुन म्हणुन नावारुपाला आला आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम